बाबो! बॉलीवूड सेलिब्रेटींच्या कार्सची केवढी ही किंमत? एका कार बदल्यात दोन घरे घेता येतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 11:49 AM2020-01-30T11:49:42+5:302020-01-30T13:47:38+5:30

जाणून घेऊया प्रसिद्घ बॉलीवूड सेलिब्रेटींच्या या आलिशान गाड्यांबद्दल

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये सर्वात महाग कार आहे आणि त्याची किंमत ऐकुन तुम्ही थक्क व्हाल, रोल्स रॉयस, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडि यांसारख्या जगातील सर्वात लोकप्रिय गाडया आहेत . एसआरकेच्या महागड्या कार बुगाटी वेरॉन (रु. १२.०० कोटी) रोल्स रॉयस ड्रॉपहेड कूप (रु. ४.२० कोटी) बीएमडब्ल्यू आय 8 (रु. २.२० कोटी)

सलमान खान बाईक व कार प्रेमी आहे आणि त्यांच्याकडे महागड्या बाईक व कारचा संग्रह आहे दबंग खानच्या महागड्या कार रेंज रोव्हर वोग (रु.४.०० कोटी) ऑडी आर 8 (रु.२.४७ कोटी) लेक्सस एलएक्स 570 (रु. २.३० कोटी)

करीना कपूर खान तिला कार्स खूप आवडतात आणि तिच्या संग्रहात अमेरिकन मस्टंग, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू 7 सेरिस आणि लेक्सस ४७0 यांचा समावेश आहे. आता ती लेक्सस ४७० वापरत आहे ज्याची किंमत जवळपास ५० लाख रुपये आहे.

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण यांच्याकडे फेरारी , रेंज रोव्हर वोग, बीएमडब्ल्यू झेड 4 या आलिशान गाड्या आहेत. अजयच्या महागड्या कार रेंज रोव्हर वोग (रु.४ कोटी) मासेराती क्वाट्रोपोर्ट (रु. २.२ कोटी) मर्सिडीज-बेंझ एस-क्लास (रु. १.00 कोटी)

परिणीती चोप्राकडे जग्वार XJL २ या देशातील सर्वात महागड्या जग्वार मॉडेल्सपैकी एक आहे आणि त्याची किंमत रु. 1.2 - 1.9 कोटीमध्ये आहे

अभिनेता हृतिक रोशनने एप्रिल 2018 मध्ये अ‍ॅस्टन मार्टिन रॅपिड एस विकत घेतली ज्याची किंमत 8 कोटी आहे. पोर्श कायेन आणि मर्सिडीज एस 500 या त्याच्या आवडत्या कार. हृतिकच्या महागड्या कार फेरारी 360 मोडेना (रु. ४. ५० कोटी) रोल्स रॉयस घोस्ट सिरीज (रु. ४. ५० कोटी) अ‍ॅस्टन मार्टिन रॅपिड एस (रु ३.८० कोटी)

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन च्या गॅरेजमध्ये रोल्स रॉयस फॅंटम, मर्सिडीज बेंझ एस 600 यांच्यासह 25 कार आहेत. बिग बीच्या महागड्या कार मर्सिडीज बेंझ एस 600 (रु. १०. ५० कोटी) रोल्स रॉयस फॅंटम (रु. ८. ०० कोटी) लॅम्बोर्गिनी मर्सिएलागो (रु. ४. ०० कोटी)

बॉलिवूड दिवा दीपिका पादुकोणकडे ऑडी क्यू 7, मिनी कूपरची आहे, याची किंमत जवळपास रु. 80 लाख आहे

रणवीर सिंगकडे अ‍ॅस्टन मार्टिन ही सर्वात महागडी कार आहे जी त्याने स्वत: ला 2017 मध्ये भेट म्हणून दिली रणवीरच्या महागड्या कार अ‍ॅस्टन मार्टिन (रु.३.५० कोटी) जग्वार एक्सजेएल (रु. १.00 कोटी)

जॉन अब्राहम याच्याकडे ऑडी क्यू 7, ब्लॅक निसान, जीटी-आर आणि लॅम्बोर्गिनी गॅलार्डो या त्याच्या महागड्या गाड्या आहेत. जॉनच्या महागड्या कार लॅम्बोर्गिनी गॅलार्डो (रु ३.०० कोटी) ब्लॅक निसान जीटी-आर (रु. २.०० कोटी)

कॅटरिना कैफकडे ऑडी क्यू 7 आहे आणि या गाडीची किंमत सुमारे रु. 80 लाख.

अभिनेता अक्षय कुमारकडे रोल्स रॉयस फॅंटम, मर्सिडीज, फेरारी, रेंज रोव्हर वोग यासारख्या महागड्या गाड्या आहेत. खिलाडी कुमार यांच्या महागड्या कार रोल्स रॉयस फॅंटम (रु ८.00 कोटी) बेंटली कॉन्टिनेंटल जीटी (रु ४. ५० कोटी) रेंज रोव्हर वोग (रु ४. ०० कोटी)

अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे मर्सिडीज एमएल क्लास आहे आणि त्याची किंमत सुमारे ९० लाख आहे

आमिर खान कडे मर्सिडीज एस 600 (रु. १०. ५० कोटी) रोल्स रॉयस घोस्ट फॅंटम (४.०० कोटी)

संजय दत्तच्या रोल्स रॉयस , घोस्ट फॅंटम, ऑडी आर 8, मर्सिडीज एम-क्लास, फेरारी या आलिशान गाड्या आहेत. संजूच्या महागड्या कार फेरारी ((रु.४. ४ कोटी) रोल्स रॉयस (रु. ४ कोटी)

रणबीर कपूरच्या गॅरेजमध्ये रेंज रोव्हर स्पोर्ट्स, ऑडी आर 8 या सर्वात महागड्या कार आहेत. रणबीरच्या महागड्या कार रेंज रोव्हर स्पोर्ट्स (रु. २.२ कोटी) ऑडी आर 8 (रु. २.४७ कोटी)