कधी शाळेतून काढलं, तर घर विकलं गेलं; पण आज कोट्यवधींचा मालक आहे रोहित शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 02:12 PM2021-07-30T14:12:13+5:302021-07-30T14:19:48+5:30

Rohit Shetty : रोहित शेट्टी हे नाव आज बॉलिवूडमधलं सर्वात मोठं नाव झालं आहे.

बॉलिवूडमधील एकापेक्षा एक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या रोहित शेट्टी याचं नाव परिचयाचं नाही असे फारच कमी लोक आढळतील. सर्वात यशस्वी दिग्दर्शकांमध्ये आज रोहित शेट्टीचं नाव घेतलं जातं.

त्यानं दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांपैकी फारच कमी चित्रपट असतील जे कोणी पाहिले नसतील किंवा ते यशस्वीही झाले नसतील. कॉमेडी, मसाला, एन्टरटेन्मेंट आणि अॅक्शननी भरलेल्या चित्रपटांसाठी त्याला ओळखलं जातं.

सर्वात श्रीमंत दिग्दर्शकांच्या यादीत रोहित शेट्टीचं नाव घेतलं जातं. परंतु त्याचं आतापर्यंतच जीवन संघर्षमय होतं. जाणून घेऊया त्याच्याबाबत काही माहित नसलेल्या गोष्टी.

रोहित शेट्टी यानी आपल्या करिअरची सुरुवात ५० रूपयांपासून केली होती. वडिलांच्या निधनानंतर त्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. अशातच कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही ढासळली होती. त्यावेळी फी न भरल्यानं त्याला शाळाही सोडावी लागली होती.

रोहित शेट्टी याचे वडिल एमबी शेट्टी हे ७० च्या दशकातील बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये व्हिलनचा रोल करत होते. त्यांचं नावही परिचयाचं होतं. त्यानंतर त्यांनी स्टंट मॅन म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

रोहित शेट्टीनं जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरूवात केली तेव्हा त्याला केवळ ५० रूपये मिळत होते. त्यानं अवघ्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये असिस्टंड डायरेक्टर म्हणून सुरूवात केली होती.

सध्या रोहित शेट्टीची कमाई महिन्याला तीन कोटी रूपये इतकी आहे. caknowledge डॉट कॉम नुसार त्याचं एकूण नेटवर्थ २४८ कोटी रूपये इतकं आहे.

रोहित शेट्टीला कार्सची अतिशय आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत. त्याच्या कलेक्शनमध्ये BMW730LD आहे. त्याची किंमत १.५ कोटी रूपये आहे.

रोहित शेट्टीचं प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडमधील मोठ्या प्रोडक्शन हाऊसपैकी एक आहे. दिग्दर्शनाव्यतिरिक्त त्यानं अनेक टीव्ही शोजही होस्ट केलेल आहेत.

याशिवाय त्यानं काही चित्रपटांसाठी स्टंटही डिझाईन केले आहेत. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड सुरूवातीपासूनच सुपरहिट आहे. तसंच सध्या तो टीव्हीवरील खतरों के खिलाडीमध्येही दिसत आहे.