धक्कादायक! गर्लफ्रेन्डला हवा होता मोबाइल, बॉयफ्रेन्डने मित्राचा मर्डर करून मिळवला फोन आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 10:36 AM2021-01-12T10:36:18+5:302021-01-12T10:46:34+5:30

मोनूचा मित्र जितेंद्रकडे स्मार्टफोन होता आणि मोनूला जितेंद्रचा मोबाइल घ्यायचा होता. यासाठी मोनूने आणखी एकाला सोबत घेतलं आणि जितेंद्रला घेऊन एके ठिकाणी गेले.

उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातील हत्येची एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका तरूणान गर्लफ्रेन्डला मोबाइल मिळवून देण्यासाठी मित्राची हत्या केली. या हत्येत सहभागी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही एक ब्लाइंड केस होती. मारेकऱ्यांना पडकणं फार आव्हानात्मक होतं.

ही घटना आग्र्याच्या सैया भागातील आहे. इथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ६ जानेवारीला आढळून आला होता. पोलिसांनी तपास केल्यावर त्याचं नाव जितेंद्र असल्याचं समजलं. जेव्हा पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला तर खुलासा झाला की, त्याची हत्या त्याचाच मित्र मोनूने केली होती.

मोनूच्या गर्लफ्रेन्डने त्याच्यामागे मोबाइल फोन घेऊन देण्याचा नांदा लावला होता. मोनू हा बेरोजगार होता. त्यामुळे तो गर्लफ्रेन्डची मोबाइलची मागणी पूर्ण करू शकत नव्हता. नंतर आरोपी मोनूने गर्लफ्रेन्डला मोबाइल देण्यासाठी एक प्लॅन तयार केला.

मोनूचा मित्र जितेंद्रकडे स्मार्टफोन होता आणि मोनूला जितेंद्रचा मोबाइल घ्यायचा होता. यासाठी मोनूने आणखी एकाला सोबत घेतलं आणि जितेंद्रला घेऊन एके ठिकाणी गेले.

मोनू आणि त्याच्या साथीदाराने जितेंद्रला पकडलं आणि शर्टने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतकाच्या नाका-तोंडात मातीही टाकली.

जेव्हा जितेंद्र मृत झाल्याचे कन्फर्म झाले तेव्हा मोनूने त्याचा मोबाइल घेतला आणि साथीदारासोबत पळ काढला. पोलिसांनी मोनू आणि त्याच्या साथीदाराला अटक करून तुरूंगात डांबलं आहे.

एसएसपी बबलू कुमार यांनी सांगितले की, ६ जानेवारीला सैया परिसरात सरसोच्या शेतात एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जितेंद्र या तरूणाचा होता. तो चमरपूर डांग घियावली धौलपूर येथे राहणारा होता. तो सैयामध्ये त्याच्या बहिणीच्या घरी आला होता.

पाच जानेवारीला बहिणीच्या घरून निघाल्यावर तो गायब झाला होता. त्यानंतर परिवाराने तो हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. एसएसपींनी सांगितले की, ही हत्या इमली बस्तीमध्ये राहणाऱ्या मोनू आणि सुमितने केली. दोघांना अटक करण्यात आली आहे.