खळबळजनक! निर्दयी पत्नीने प्रेमासाठी केली पतीची हत्या, प्रियकरासोबत मिळून कापला पतीचा गळा....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 03:22 PM2021-03-06T15:22:42+5:302021-03-06T15:45:51+5:30

या दोघांनाही याची कल्पना नव्हती की, पोलीस त्यांच्यापेक्षा जास्त हुशार असतात. पोलिसांनी ३ तासात या हत्येचा खुलासा केला आणि दोघांनाही अटक केली.

असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं आणि प्रेम चूक-बरोबरचा अंदाज लावत नाही. अशीच एक खळबळजनक आणि हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. याबाबत वाचून तुमच्या पायाखालची जमिनही सरकेल. ही घटना आहे जयपूरच्या हिरनोदा गावातील.

इथे प्रेमात आडकाठी ठरत असलेल्या पतीची पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हत्या केली. ही हत्या आत्महत्या दाखवण्यासाठी खोटी कहाणीही सांगितली. पण हे फार काळ टिकू शकलं नाही. आता दोघेही तुरूंगात आहेत.

जयपूरपासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरनोदामध्ये प्रेमप्रकरणामुळे पत्नीने आपल्या पतीची गळा कापून हत्या केली. ही घटना आहे ५ मार्चची. पोलिसांना माहिती मिळाली की, ३३ वर्षीय दिनेश वर्माचा गळा कापलेला मृतदेह सापडला आहे.

सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची गंभीरता लक्षात घेऊन घटनास्थळी डॉग स्क्वायड, एफएसएल आणि एमओबीची टीम बोलवून पुरावे जमा केले. तेच पोलिसांनी दिनेशचा कापलेला गळा पाहून जरा शंका आली की, ही आत्महत्या नाही. हत्य आहे.

चौकशी दरम्यान पत्नीने पोलिसांना आत्महत्येची कोटी कहाणी सांगितली. मात्र, पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली तेव्हा समोर आले की, हे प्रेम प्रकरणाचं प्रकरण आहे. मृत दिनेशला त्याच्या पत्नीचं शेजारच्या योगेशसोबत अफेअर सुरू असल्याचं समजलं होतं.

त्यामुळे प्रेमाच्या मार्गातील काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकर योगेशसोबत मिळून दिनेशच्या हत्येचा प्लॅन केला. त्यांनी दिनेशचा चाकूने गळा कापून हत्या केली.

पत्नीने सात जन्म पतीची साथ देण्याची लग्नात घेतलेली शपथ विसरली आणि तिने प्रेमासाठी पतीची हत्या केली. त्याचा गळा कापून त्याची हत्या केली. नंतर केवळ ३ तासात या घटनेला खुलासा करत पोलिसांनी दोघांना तुरूंगात टाकलं.

चौकशी दरम्यान मृतकाची पत्नी हेमलताने प्रियकरासोबत मिळून एक महिन्याआधीच पतीची हत्या करण्याचा प्लॅन केला होता. दोन दिवसाआधीच एक धारदार चाकू रूममध्ये ठेवण्यात आला होता. जेव्हा पती दारू पिऊन घरात आला तेव्हा रात्री १ वाजता पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं.

यानंतर तिच्या प्रियकराने धारदार चाकूने पतीचा गळा कापला. त्यानंतर प्रेयसीला आत्महत्येचं खोटं कारण दे असं सांगून चाकू घेऊन फरार झाला. पत्नी रात्री जोरजोरात ओरडू लागली आणि पतीने आत्महत्या केल्याचं सांगत रडू लागली.

पण या दोघांनाही याची कल्पना नव्हती की, पोलीस त्यांच्यापेक्षा जास्त हुशार असतात. पोलिसांनी ३ तासात या हत्येचा खुलासा केला आणि दोघांनाही अटक केली.