क्लार्क महिला कशी बनली गोल्ड स्मगलिंग क्वीन? मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:12 PM2020-07-08T12:12:29+5:302020-07-08T12:31:23+5:30

कस्टम विभागाने दुतावासातील माजी कर्मचारी सरित नायरला ताब्यात घेतलं आहे. आणखी एक कर्मचारी स्वप्ना सुरेशचा शोध घेतला जात आहे.

केरळच्या तिरूवनंतपुरम एअरपोर्टवर डिप्लोमॅटिक बॅगेजमधून 30 किलो सोनं सीज केल्यानंतर गोल्ड स्मगलिंग रॅकेटचा भांडाफोड होणं सुरू झालं. हे सोनं संयुक्त अरब अमीरात दुतावासाच्या नावावर होतं. चौकशीतून समोर आलं की, दूतावासाचे माजी कर्मचारी या स्मगलिंगमध्ये सामील होते. कस्टम विभागाने दुतावासातील माजी कर्मचारी सरित नायरला ताब्यात घेतलं आहे. आणखी एक कर्मचारी स्वप्ना सुरेशचा शोध घेतला जात आहे.

स्वप्ना सुरेशचं केसमध्ये नाव येताच केरळच्या राजकारणात भूकंप आलाय. तिचा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झालाय. मुख्यमंत्री म्हणाले की, ते चौकशीसाठी तयार आहे. अशात चला जाणून घेऊन अखेर ही स्वप्ना सुरेश आहे तरी कोण...

UAE च्या अबूधाबीमध्ये स्वप्नाचा जन्म झाला. तिथेच तिचं शिक्षण झालं आणि ती एअरपोर्टमध्ये नोकरीला लागली. लग्नही झालं पण लगेच तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती मुलीसोबत तिरूवनंतपुरममध्ये राहू लागली. पुढील दोन वर्षे तिने एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं. नंतर तिला 2013 मध्ये एअर इंडिया सॅट्समध्ये नोकरी मिळाली.

UAE च्या अबूधाबीमध्ये स्वप्नाचा जन्म झाला. तिथेच तिचं शिक्षण झालं आणि ती एअरपोर्टमध्ये नोकरीला लागली. लग्नही झालं पण लगेच तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती मुलीसोबत तिरूवनंतपुरममध्ये राहू लागली. पुढील दोन वर्षे तिने एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं. नंतर तिला 2013 मध्ये एअर इंडिया सॅट्समध्ये नोकरी मिळाली.

2016 मध्ये जेव्हा फसवणुकीच्या केसमध्ये क्राइम ब्रॅन्चने तिची चौकशी सुरू केली. तेव्हा ती पुन्हा अबूधाबीला गेली. तिथे ती UAE कान्सुलेटमध्ये कान्सुलेट जनरलची सेक्रेटरी बनली. पुन्हा गेल्यावर्षी तिने नोकरी सोडली. पोलिसांचं मत आहे की, तिला नोकरीहून काढण्यात आलंय.

जेव्हा स्वप्ना एअर इंडिया सॅड्समध्ये ट्रेनर होती तेव्हा तिच्यावर एक ऑफिसरला फसवण्याचा आरोप लावण्यात आला होता. मनोरमा ऑनलाइननुसार, जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू होती तेव्हा पोलिसांवर दबाव टाकण्यात आला होता की, तिला सोडून देण्यात यावं. चौकशी दरम्यान स्वप्नाने हेही लपवलं होतं की, ती केरळ आयटी विभागाची कर्मचारी होती.

UAE च्या कॉन्सुलेटमध्ये नोकरी करणं हा स्वप्नाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. इथे तिची मोठ-मोठ्या लोकांसोबत ओळख झाली. मोठ्या हॉटेल्समधील पार्ट्यांमध्ये ती नेहमी दिसू लागली होती. अरबीसहीत अनेक भाषा येणारी स्वप्ना केरळला येणाऱ्या अरब नेत्यांच्या टीममध्ये असायची.

डील वुमन - जेव्हा अभिनेत्री शामना खानची एक्सटॉर्शन केसमध्ये चौकशी केली गेली तेव्हा एका महिलेचं नाव समोर आलं. डील वुमन नावाने प्रसिद्ध असलेल्या या महिलेबाबत पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा कस्टमावाल्यांनी 13.5 कोटी रूपयांचं सोनं डिप्लोमॅटिक बॅगेजमधून ताब्यात घेतलं.

पोलिसांना कळालं की, गोल्ड स्मगल करणारी गॅंग मॉडल्स आणि अभिनेत्रींच्या माध्यमातून तस्करी करत आहेत. जेव्हा आणखी विचारपूस केली गेली तेव्हा समोर आलं की, स्वप्ना सरेश हीच मुळात 'डील वुमन' आहे. जी या गॅंगला सिरिअस केसेसमधून बाहेर काढत होती.

केरळ सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्रेटरी एम शिवशंकर यांचं नाव यात येत आहे. असे सांगितले जात आहे की, त्यांनीच स्वप्नाला आयटी विभागात नोकरी दिली होती. आयटी सचिव मुख्यमंत्र्यांचेही सचिव आहेत आणि ते स्वप्नाच्या घरी नेहमीच येत-जात होते.

दरम्यान मुख्यमंत्री विजयन यांच्या कार्यालयाने स्वप्नासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचं सांगितलंय. राज्य सरकारने स्वप्नाला केरळ स्टेट आयटी विभागातून बडतर्फ केलंय. तर शिवशंकर यांना मुख्यमंत्र्यांच्या सचिव पदावरून हटवण्यातही आलंय.

Read in English