ऐकावे ते नवलच! कोंबड्यांना पोलिसांनी केलीय अटक, गेल्या २५ दिवसांपासून आहेत लॉकअपमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 11:17 AM2021-02-06T11:17:17+5:302021-02-06T11:40:59+5:30

गुन्ह्याच्या आरोपाखाली पोलिसांनी व्यक्तींना अटक केल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. मात्र, तेलंगणामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.

याठिकाणी पोलिसांनी दोन कोंबड्यांना अटक केली आहे. या दोन कोंबड्यांना गेल्या २५ दिवसांपासून पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये बंद करण्यात आले असून ते सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत.

ज्या सट्टेबाजांच्या प्रकरणात या कोंबड्यांना अटक करण्यात आली होती. ते सट्टेबाजांची जामीनावर सुटका झाली आहे. मात्र, या कोंबड्यांना अद्याप अटक करण्यात आली आहे.

हे प्रकरण तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील आहे. येथील मिदीगोंडा पोलीस ठाण्यात गेल्या २५ दिवसांपासून या कोंबड्यांना लॉकअपमध्ये बंद केले आहे. पोलिसांनी त्यांना 10 जानेवारीला ताब्यात घेतले होते.

दरम्यान, संक्रांतीच्या सणानिमित्त कोंबड्यांची झुंज लावण्याचा खेळ सुरु होता. यावर सट्टेबाजीही सुरु होती. त्यावेळी पोलिसांनी या सट्टेबाजांवर धाड टाकली आणि घटनास्थळावरून दहा लोकांना अटक केली.

या सट्टेबाजांसोबत दोन कोंबड्यांना आणि एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. यानंतर सर्व सट्टेबाज जामीनावर जेलमधून बाहेर आले.

मात्र, या कोंबड्यांचा दावा करण्यास कुणीही पोलीस स्टेशनमध्ये आले नाही. विशेष म्हणजे पोलिसांना या प्रकरणाचा पुरावा म्हणून कोंबड्यांनाही ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, या कोंबड्यांची सुटका खटल्याच्या सुनावणीनंतरच होऊ शकते.

कोंबड्यांना सोडण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांची बोली लावली जाईल आणि जे जास्त बोली लावतील, त्यांना हे देण्यात येतील.

Read in English