पुण्याची प्रीती इंदूरची ड्रग्जवाली आंटी बनली, मोठ्या स्वप्नांपासून ते ड्रग्जच्या काळ्याधंद्यापर्यंतची गोष्ट 

By पूनम अपराज | Published: December 14, 2020 04:40 PM2020-12-14T16:40:33+5:302020-12-14T18:41:18+5:30

Drug Case : स्वादीष्ट पदार्थ आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध इंदूर हे आता ड्रग्जच्या तावडीत सापडले आहे. येथे, ड्रग्सचे असे एक विश्व उघडकीस आले ज्याने सर्वांनाच चकित केले. ... आणि त्याचे कारण म्हणजे सध्या आता चर्चेत असलेली ड्रग आंटी. पोलिसांनी असे उघडकीस आणले आहे की, ड्रगवाल्या आंटीचं नाव प्रीती आहे आणि ती पुण्याची रहिवासी आहे आणि तिला आपल्या मुलाला पायलट बनवायचे होते. या रिपोर्टमध्ये आपण जाणून घेऊया की पुण्याची प्रीती इंदूरची ड्रग आंटी कशी झाली? तिच्या मोठ्या स्वप्नांचा प्रवास ड्रग्जच्या रस्त्यावरून सुरु कसा झाला?

इंदूर पोलिसांना शहरात अमली पदार्थांच्या पुरवठ्याविषयी माहिती देण्यात आली. यानंतर, पुरावा शोधणे सुरू झाले, परंतु हाताला काही विशेष लागले नाही. अशा परिस्थितीत एसआय प्रियंका शर्मा यांना ग्राहक बनवून ड्रग पॅडलरकडे पाठवले गेले होते, परंतु सुरुवातीला त्याचा फारसा फायदा झाला नाही. एसआय प्रियंकाने हार मानली नाही आणि ती सतत 10 दिवस ड्रग पॅडलरला भेटत राहिली. यानंतर पॅडलरला प्रियंका ड्रग व्यसनी वाटली आणि त्याने एसआयला ड्रग्ज नेटवर्कमध्ये तिलाजोडले. वास्तविक, पेडलर्स ओळखीशिवाय कोणालाही ड्रग्ज देत नाहीत.

इंदूरमध्ये ड्रग्जचे नेटवर्क उघडकीस आल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. खरं तर, शहरात एकही पब शिल्लक नव्हता, ज्यामध्ये या ड्रग्ज विक्रेत्यांचा प्रवेश नव्हता. या व्यतिरिक्त रेस्टॉरंट्स, पूल क्लब हेदेखील त्याचे लक्ष्य होते. जिमच्या माध्यमातून देखील तरूणांच्या नसानसात ड्रग्ज पसरवले जात होते. शहरातील अनेक श्रीमंत पुरुष व स्त्रियांना ड्रग्सच्या जाळ्यात अडकले होते. त्यांना याचे इतके व्यसन लागले होते की मृत्यूची ही वस्तू खरेदी करण्यासाठी एबी रोडला जायचे.

जिममधून ड्रग्स पुरवले जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी जिममध्ये येणाऱ्या व्यक्तींना ड्रग्जसाठी व्यसनाधीन करणारे जिम ट्रेनर धीरज सोनात्या याच्याशी हातमिळवणी केली. तो लोकांना वजन कमी करण्याचे सांगून ड्रग्ज देत असे.

ड्रग नेटवर्कच्या खुलासादरम्यान पोलिसांनी जिम ट्रेनर धीरज याच्यासह अनेकांना अटक केली. यात दोन तरूणींसह सहा पॅडलरचा समावेश आहे. सोहन उर्फ जोजो, कपिल पाटणी, विक्की परिणी, याशमीन, आफरीन आणि सद्दाम अशी त्यांची नावे आहेत.आरोपींच्या चौकशीदरम्यान स्कीम-78 मध्ये राहणाऱ्या ड्रग वाल्या आंटीचे नाव समोर आले. जेव्हा पोलिसांनी तिला पकडले तेव्हा इंदूरमधील अमली पदार्थांच्या गोरखधंद्याचे भांडाफोड झाले. शहरातील अनेक पब, रेस्टॉरंट्स, कॅफे, पूल क्लब आणि जिममध्ये ड्रग्ज पुरवल्याची कबुली तिने दिली. तसेच गोवा आणि मुंबई येथील नायजेरियन तस्करांना वायर कनेक्शनची माहिती दिली. अमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तीने सांगितले की, ती दरमहा दहा लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री करीत असे.

जेव्हा ड्रगवाल्या आंटीने तिची कहाणी सांगितली तेव्हा सर्व अवाक झाले. या ड्रग्जच्या काळ्या व्यवसायापासून अवघ्या पाच वर्षांत ती लक्षाधीश कशी झाली, हे तिने सांगितले. त्याचवेळी तिने पुण्याची प्रीती इंदोरची ड्रग आंटी बनण्याची पूर्ण कहाणी सांगितली. वास्तविक, आरोपी महिलेने दावा केले की, तिचे खरे नाव प्रीती आहे आणि ती पुण्याची आहे. तथापि, पोलिस हे सत्य म्हणून स्वीकारत नाहीत, तिच्याकडे अनेक ओळखपत्रे सापडली आहेत, ज्यावर प्रीती, सपना, प्रेरणा आणि काजल इत्यादींची नावे लिहिली आहेत.

पोलिस चौकशी दरम्यान आरोपी महिलेने सांगितले की तिचे खरे नाव प्रीती आहे आणि ती पुण्याची आहे. तिने इंग्रजीतून एमए शिक्षण पूर्ण केले. याशिवाय हिंदी आणि मराठी भाषेतही त्यांची चांगली पकड आहे. तिचे लग्न धार जिल्ह्यातील कुक्षी येथे दीपक नावाच्या माणसाशी झाले होते, पण प्रीतीची मोठी स्वप्ने होती. त्यामुळे तिचा पतीसोबत वाद होता. १९९१ मध्ये ती आपल्या पतीला सोडून मुलासह इंदूरला गेली. तिला आपल्या मुलाला पायलट बनवायचे आहे, असे तिने सांगितले, पण इंदूरमध्ये तिची ओळख रिचा नावाच्या मुलीशी झाली. तेव्हा रिचाने पैशाच्या लालसेने ड्रग्सच्या व्यवसायात उडी घेतली. सुरुवातीला तिने इंदूरमधील मॉलमध्ये रिअल स्टेट कंपनीत भागीदार म्हणून काम करण्यास सुरवात केली. दिवसा तिने रिअल इस्टेटची नोकरी घेतली आणि रात्री पार्टी आणि पबमध्ये ड्रग्ज पुरवठा सुरू केला. अस्खलित इंग्रजी बोलल्यामुळे ती लवकरच उच्चभ्रू लोकांत मिसळली. ड्रग्जचा पुरवठा करीत असताना तिला 'ड्रग वाली आंटी' नाव पडले.

मादक पदार्थांशी संबंधित आंटीचा मुद्दा समोर आल्यानंतर मध्य प्रदेशात राजकारणाने जोर धरला आहे. वास्तविक, आंटीचा मुलगा यश याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तो मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानसमवेत दिसला. अशा परिस्थितीत काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे मीडिया समन्वयक नरेंद्र सलूजा म्हणाले की, आंटी आणि तिच्या मुलाला भाजपाचे संरक्षण होते. त्यांना सर्वत्र भाजपा कार्यकर्ता म्हणून पाहिले गेले. आता आंटी पकडल्यानंतर सरकार ड्रग माफियांवर कारवाईचे नाटक करीत आहे. यावर भाजपानेही पलटवार केला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष गौरव रणदिवे म्हणाले की, सार्वजनिक जीवनात हजारो लोक भेटतात आणि छायाचित्रे घेतात. काँग्रेसने स्वत: चा विचार केला पाहिजे