बापरे! ५० हून अधिक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त; आधी प्रेम, मग संबंध ठेवायचा अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 10:04 PM2022-04-12T22:04:51+5:302022-04-12T22:07:13+5:30

जयपूरच्या करधनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नराधमाला भिवाडी येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून धक्कादायक खुलासे झाले आहेत. या तरुणीची हत्या तिचा प्रियकर मिंटू उर्फ विक्रम याने केली होती.

मिंटूने यापूर्वीही त्याच्या मैत्रिणीची हत्या करून तिला ग्वाल्हेरमध्ये रेल्वे रुळांवर फेकून दिले आहे. याशिवाय अल्वरमध्येही एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा सेक्स अ‍ॅडिक्ट असून त्याचे आतापर्यंत ५० हून अधिक मुलींसोबत संबंध आहेत.

आरोपी मिंटू भिवाडी येथे ओळख बदलून राहत होता. एक गुन्हा केल्यानंतर तो दुसऱ्या शहरात जायचा. कुठे आयकर अधिकारी, कुठे लष्करी अधिकारी तर कुठे पोलीस बनून तो राहायचा. ग्वाल्हेरमधील मुलगीही तिच्या बहिणीकडे आली होती जिला मिंटूने पळवून नेले.

आरोपी मिंटूने लग्न करण्याचा हट्ट धरलेल्या ग्वालियर आणि जयपूरमधील मुलीला मारून टाकलं. मिंटू त्याच्या कुटुंबाशी कुठलाही संपर्क ठेवत नाही. या आरोपीने अन्य मुलींनाही त्याच्या जाळ्यात ओढून शिकार केले असेल असा पोलिसांचा अंदाज आहे.

त्यामुळे या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. आरोपी मिंटू हा मानसिकदृष्ट्या सायको असल्याचे दिसत असल्याने या प्रकरणात मानसशास्त्रज्ञाचीही मदत घेण्यात येत आहे. भिवाडीमध्येही हा नाव बदलून पोलीस म्हणून राहत होता.

मिंटू आणि रोशनी जयपूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. एका हॉटेलमध्ये तिची मिंटूशी भेट झाली. या हॉटेल भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. दोघेही काही काळासाठी उत्तर प्रदेशातील हरदोई येथे गेले.

मात्र त्यानंतर मिंटू आणि रोशनी राजस्थानला परत आले आणि करधनीच्या आर्मी नगरमध्ये राहू लागले. मिंटू रोशनीला वेश्याव्यवसाय करू नये, रात्रीची नोकरी करू नये, असे समजावत असे. रोशनीने वेश्याव्यवसायाचे काम सोडले नाही तेव्हा मिंटूने तिची उशीने गळा आवळून हत्या केली आणि नंतर येथून पळ काढला.

मात्र, आरोपीने शेजाऱ्याला फोन करून रोशनीशी बोलण्याचा बहाणाही केला. दोन महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. आरोपी अलवरच्या भिवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिस तपासात समोर आले आहे की, आरोपी स्वत:ला आर्मी ऑफिसर आणि इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून सांगायचा. आरोपीने इन्कम टॅक्स ऑफिसर आणि आर्मीच्या ड्रेसमध्ये फोटोही काढले आहेत. यामुळे त्याने आपलं वर्चस्व लोकांवर राखले होते.

मिंटूने अलवर येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी असून गेल्या ३ वर्षांपासून फरार होता. ग्वाल्हेरमध्येही आरोपीने आपल्या एका साथीदारासह एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून दिला होता. तपासादरम्यान आरोपीने आतापर्यंत ५० हून अधिक मुलींना आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपली शिकार बनवल्याचे समोर आले आहे.