पोलखोल! जिम ट्रेनरसोबतचे प्रायव्हेट फोटो आले समोर, डॉक्टर पती-पत्नी कैदेत; महिलेने दिली होती सुपारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:57 AM2021-09-24T11:57:02+5:302021-09-24T12:07:51+5:30

असं सांगण्यात आलं की, खुशबू पाच वर्षाआधी दानापूरचा राहणारा मिहिर याच्या संपर्कात होती. दोघांचे फार जवळचे रिलेशन होते. अशातच खुशबूच्या आयुष्यात विक्रम सिंह आला.

पटनामध्ये जिम ट्रेनर विक्रम सिंह याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. जिम ट्रेनर गोळीबार कांडावर पोलिसांनी सांगितलं की, हा हल्ला जेडीयूचे माजी डॉक्टर विंगचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार सिंहची पत्नी खुशबू हिनेच घडवून आणला होता. विक्रम आणि खुशबू आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि तासंतास फोनवर बोलत राहत होते. पोलिसांनी आता खुशबूसहीत ६ लोकांना अटक केली आहे.

जिम ट्रेनर विक्रम सिंह याच्यावर कदमकुआं भागात १८ सप्टेंबरला पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी विक्रमने पोलिसांना सांगितलं की, डॉ. राजीव आणि त्यांची पत्नी खुशबूने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर पटणा पोलिसांनी डॉ. राजीव आणि खुशबू यांची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.

आता पोलिसांनी या प्रकऱणाचा खुलासा केला आहे. जिम ट्रेनरवर गोळीबार खुशबू हिच्या सांगण्यावरूनच करण्यात आला होता. यासाठी तिने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला संपर्क केला होता. त्यानेच एका शूटरची व्यवस्था केली होती. अशात आता जिम ट्रेनरसोबतचे खुशबूचे अनेक फोटो समोर आले आहेत.

अशं सांगण्यात आलं की, खुशबू पाच वर्षाआधी दानापूरचा राहणारा मिहिर याच्या संपर्कात होती. दोघांचे फार जवळचे रिलेशन होते. अशातच खुशबूच्या आयुष्यात विक्रम सिंह आला. त्यानंतर हळूहळू खुशबू मिहिरपासून दूर गेली.

प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, विक्रम आणि खुशबू तासंतास फोनवर गप्पा मारत होते. जानेवारीपासून आतापर्यंत विक्रम आणि खुशबू यांच्यात ११०० वेळा फोनवर बोलणं झालं. आता दोघांचे काही खास फोटो समोर आले आहेत. ज्यांवरून हे दिसून येतं की, ते किती जवळ होते.

पण खुशबू आणि विक्रम यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. विक्रमला दूर करण्यासाठी खुशबूने प्लॅन केला. यासाठी तिने तिच्या पहिला प्रियकर मिहिर याला संपर्क केला. त्याने अमन नावाच्या एका शूटरला सुपारी दिली.

सुपारीची रक्कम १ लाख ८५ हजार रूपये ठरली होती. दोन महिने रेकी केल्यानंतर शूटरने हा हल्ला केला. मात्र, सुदैवाने पाच गोळ्या लागूनही जिम ट्रेनर विक्रम वाचला. त्याने खुशबू आणि तिच्या पती विरोधात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ६ आरोपींना अटक केली. ज्यात डॉ. राजीव आणि त्याची पत्नी खुशबू यांचाही समावेश आहे. दोन लोक अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.