वडील ओरडल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या एकुलत्या एक मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

By पूनम अपराज | Published: January 29, 2021 09:21 PM2021-01-29T21:21:19+5:302021-01-29T21:29:37+5:30

Suicide : झुंझुनवाला कुटुंबातील एकुलत्या एक मुलाने अखेरचे पाऊल उचलले आणि आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. ही हृदयद्रावक घटना सुरत शहरात घडली आहे. 

झुंझुनवाला कुटुंबातील एकुलत्या एक मुलाने अखेरचे पाऊल उचलले आणि आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. ही हृदयद्रावक घटना सुरत शहरात घडली आहे. 

या मुलाने अगदी क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केली, त्यामुळे पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

मृत मुलाचे आई-वडिलांचा हा एकुलता एक मुलगा होता आणि या परिस्थितीत घडलेली घटना हृदयद्रावक आहे. या घटनेचा तपशील अशी आहे की, झुंझुनवाला कुटुंब शहरातील वेसू भागात फ्लॉरेन्स अपार्टमेंटमध्ये राहते.

या घटनेचा तपशील अशी आहे की, झुंझुनवाला कुटुंब शहरातील वेसू भागात फ्लॉरेन्स अपार्टमेंटमध्ये राहते. संततीमध्ये या कुटुंबाचा एकच मुलगा होता. विकास झुंझुनवाला यांचा मुलगा तनुष दहावीत शिकत होता. मात्र, काल सकाळी तो आपल्या मित्रांसह सायकल चालवण्यासाठी गेला होता.

तनुश परत आल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला फटकारले आणि सायकल चालविण्यास नकार दिला. मात्र, दुपारी घरीच खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. कुटुंबीयांनी मुलाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण तो घटनास्थळीच मृत झाला. घटनेची माहिती मिळताच उमरा पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत सायकल चालवण्याबद्दल वडिलांनी फटकारणे जीवघेणं ठरलं.