धक्कादायक! दोन लाख रूपयात पत्नीला विकून खरेदी केला महागडा मोबाइल, २ महिन्यांआधीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 02:06 PM2021-10-23T14:06:34+5:302021-10-23T15:13:06+5:30

पोलीस अधिकारी बुलु मुंडा यांनी सांगितलं की, अल्पवयीन किशोर सोशल मीडियाच्या माध्यमातून २४ वर्षीय तरूणीच्या संपर्कात आला होता.

राजस्थानमध्ये लग्नाच्या दोन महिन्यांनंतर १ लाख ८० हजार रूपयात आपल्या पत्नीला एका ५५ वर्षीय व्यक्तीला विकण्याच्या आरोपात १७ वर्षीय किशोरला अटक करण्यात आली आहे. आरोपी किशोर ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्यात राहणारा आहे. पोलीस अधिकारी बुलु मुंडा म्हणाले की, अल्पवयीन किशोर सोशल मीडियाच्या माध्यमातून २४ वर्षीय तरूणीच्या संपर्कात आला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यानंतर दोघांचे परिवार दोघांचं पारंपारिक पद्धतीने लग्न लावून देण्यास तयार झाले. लग्नाच्या ठीक दोन महिन्यांनंतर किशोरने काही आर्थिक समस्यांचा हवाला देत आपल्या पत्नी आपल्यासोबत रायपूर विटांच्या भट्टीवर काम करण्यासाठी आणि एकत्र कमावण्यासाठी सांगितलं. पण त्याऐवजी तो आपल्या पत्नीला राजस्थानमधील एका गावात घेऊन गेला. ५५ वर्षीय व्यक्तीला पत्नीला विकलं ऑगस्टमध्ये दाम्पत्य एका विटाच्या भट्टीवर काम करण्यासाठी रायपूर आणि झांसी मार्गे राजस्थानला गेले. नव्या नोकरीच्या काही दिवसांनंतर किशोरने आपल्या पत्नीला बारां जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय व्यक्तीला एक लाख ८० हजार रूपयांना विकलं. आपल्या पत्नीला विकल्यानंतर किशोरने खाण्यावर बराच पैसा खर्च केला आणि काही पैशांनी महागडा मोबाइल खरेदी केला. त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना ओडिशातील घरी परत बोलवलं आणि आरोप लावला की, पत्नी कुणासोबत तरी पळून गेली. मुलीच्या घरच्यांनी त्याच्या कहाणीवर विश्वास ठेवला नाही आणि पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले तर त्याच्या कहाणीत काहीतरी गडबड दिसली. तक्रारीवरून पोलिसांनी चौकशीसाठी एसपी नितीन कुसालकर यांनी एक टीम तयार केली. एसपीने सांगितलं की, आम्ही त्याची चौकशी केली आणि समजलं की, त्याने त्याच्या पत्नीला विकलं. तरूणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक टीम राजस्थानला पाठवली. ओडिसाहून पोलिसांची टीम बारां गावात पोहोचली तेव्हा तरूणीला वाचवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. कारण गावातील लोकांनी रस्त्यावर जाम केला होता आणि तरूणीला पोलिसांसोबत जाऊ देत नव्हते. ५५ वर्षीय व्यक्तीने सांगितलं की, आम्ही तिला १ लाख ८० हजार रूपयात खरेदी केलं आहे. राजस्थान पोलिसांच्या मदतीने ओडिशा टीम तरूणीला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यास यशस्वी ठरली. तरूणीचा चौकशी केली गेली. तेव्हा तिला विचारण्यात आलं की तिला कुठे जायचं आहे तर ती ओडिशात आपल्या आई-वडिलांकडे जाण्याचं बोलली. त्यानंतर गावातील लोक तिला सोडण्यास तयार झाले. किशोरने दावा केला की, त्याने आपल्या पत्नीला विकलं नव्हतं तर त्याने तिला ६० हजार रूपयात गहाण ठेवलं होतं. तो म्हणाला की, त्याला पैशांची गरज होती. कारण त्याला हृदयाचा आजार आहे आणि त्याला सर्जरीची गरज आहे. १७ वर्षीय किशोरला न्यायालयात हजर करून त्याला सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे.

पोलीस अधिकारी बुलु मुंडा यांनी सांगितलं की, अल्पवयीन किशोर सोशल मीडियाच्या माध्यमातून २४ वर्षीय तरूणीच्या संपर्कात आला होता. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांच्याही परिवाराने पारंपारिक पद्धतीने दोघांचं लग्न लावून देण्यास तयारी दर्शवली.

लग्नाच्या ठीक दोन महिन्यांनंतर किशोरने काही आर्थिक समस्यांचा हवाला देत पत्नीला रायपूरला आपल्यासोबत विटाच्या भट्टीवर काम करण्यास चलण्यास सांगितलं. दोघे एकत्र पैसे कमावू असंही तो म्हणाला. पण त्याऐवजी तो आपल्या पत्नीला राजस्थानमधील एका गावात घेऊन गेला.

ऑगस्टमध्ये दाम्पत्य विटाच्या भट्टीवर काम करण्यासाठी रायपूर आणि झांसी मार्गे राजस्थानला गेलं. आपल्या नव्या नोकरीच्या काही दिवसांनंतर किशोरने आपल्या पत्नीला बारां जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय व्यक्तीला १ लाख ८० हजार रूपयात विकलं.

आपल्या पत्नीला विकल्यानंतर किशोरने खाण्यावर पैसे खर्च केले आणि त्यानंतर एक महागडा मोबाइल फोनही खरेदी केला. त्याने वडिलांना ओडिशातील घरी बोलवलं आणि सांगितलं की, पत्नी कुणासोबत तरी पळून गेली. मात्र, मुलीच्या परीवाराने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्या कॉल रेकॉर्डची चौकशी केली आणि त्याच्या कहाणीत काहीतरी गडबड दिसून आली.

तक्रारीच्या आधारावर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोलांगीर एसपी नितीन कुसालकरने एक टीम तयार केली. एसपीने सांगितलं की, आम्ही त्याची चौकशी केली आणि समजलं की त्याने पत्नीला विकलं आहे. तरूणीच्या शोधासाठी एक टीम राजस्थानला पाठवली आहे.

ओडिशा पोलिसांची टीम बारां गावात पोहोचल्यावर तरूणीला वाचवण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागली. कारण गावातील लोकांना रस्ता जाम केला होता आणि ते तरूणीला पोलीस स्टेशनमध्ये नेऊ देण्याच्या मूडमध्ये नव्हते. ५५ वर्षीय व्यक्ती म्हणाला की, आम्ही १ लाख ८० हजार रूपयात तिला खरेदी केलं.

नंतर राजस्थान पोलिसांच्या मदतीने ओडिशा टीम तरूणीला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तरूणीची चौकशी केली आणि तिला विचारलं की, तुला कुठं जायचं आहे. तर तिने ओडिशामध्ये आई-वडिलांकडे जायचं असल्याचं सांगितलं.

किशोर दावा केला की, त्याने पत्नीला विकलं नाही तर त्याने तिला ६० हजार रूपयात गहाण ठेवलं होतं. तो म्हणाला की, त्याला पैशांची गरज होती. कारण त्याचा हृदयाचा आजार आहे आणि त्याची सर्जरी करायची आहे. १७ वर्षीय किशोरला शुक्रवारी कोर्टात सादर केलं आणि त्यानंतर सुधार गृहात पाठवण्यात आलं.