पत्नीचा प्रियकरासोबत नग्न व्हिडीओ पतीने पाहिला अन् रागाच्या भरात केली तिची हत्या 

By पूनम अपराज | Published: November 7, 2020 08:55 PM2020-11-07T20:55:02+5:302020-11-07T21:12:54+5:30

Murder : महाराष्ट्रातील ठाण्यात एका 50 वर्षीय व्यक्तीने सोशल मीडियावर पत्नीचा प्रियकरासोबत अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.

दाखल गुन्ह्यानुसार त्या व्हिडिओमध्ये पत्नी तिच्या प्रियकरासमवेत दिसली. हत्या केल्यानंतर आरोपी रफीक मोहम्मद युनूस (५०) यांनी स्वत: ला भिवंडीतील पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनुस आणि त्याची पत्नी नसरीन आपल्या तीन मुलांसमवेत भिवंडीतील अंसार नगर भागात राहत होते.

लॉकडाऊनदरम्यान युनुसची नोकरी गेली, त्यानंतर नसरीन तीन मुले घेऊन नौगांव परिसरातील आपल्या बहिणीच्या घरी राहायला गेली.

युनूसची पत्नी नसरीनचा प्रियकर सद्दामसोबतचा नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जेव्हा युनुसने व्हिडिओ पाहिला तेव्हा तो संतापला होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यानंतर तो आपल्या पत्नीला भेटायला गेला आणि चाकूने वार करून तिला ठार मारले. हत्येनंतर त्याने शांती नगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे की, आरोपी पती युनुसच्या पत्नीचा दुसर्‍या व्यक्तीशी संबंध असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून युनूस त्रस्त असल्याचे तपासात समोर आले आहे.