नोकरी लावतोय, माझी इच्छाही पूर्ण कर; सरकारी क्लार्कचा मेसेज येताच तरुणीला धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 10:04 AM2021-03-20T10:04:49+5:302021-03-20T10:10:04+5:30

Crime News: कर्नाटकात सध्या असेच एक हायप्रोफाईल प्रकरण गाजत आहे. बेळगावचे माजी पालकमंत्री जारकीहोळी यांचा एका तरुणीसोबतचा अश्लिल व्हिडीओ व्हाय़रल झाला होता. यामध्ये देखील त्या तरुणीला नोकरी लावण्याच्या आमिषातून जारकीहोळींनी शरीरसुखाची मागणी केली होती.

परिस्थितीचा फायदा घेऊन पैशांची मागणी करणारे किंवा छळणाररे अनेक प्रकार कानावर येतात. परंतू एका तरुणीला तिला सरकारी नोकरी लावून देण्यासाठी थेट शरीरसुखाचीच मागणी करणारा सरकारी कर्मचारी गजाआड झाला आहे.

कर्नाटकात सध्या असेच एक हायप्रोफाईल प्रकरण गाजत आहे. बेळगावचे माजी पालकमंत्री जारकीहोळी यांचा एका तरुणीसोबतचा अश्लिल व्हिडीओ व्हाय़रल झाला होता. यामध्ये देखील त्या तरुणीला नोकरी लावण्याच्या आमिषातून जारकीहोळींनी शरीरसुखाची मागणी केली होती.

असाच काहीसा प्रकार कानपूरच्या देहातमध्ये घडला आहे. तेथील विकास भवनात नोकरीसाठी अर्ज करण्यास आलेल्या तरुणीसोबत एका सरकारी कर्मचाऱ्याने अश्लिल मेसेज केले आहेत.

या तरुणीने पोलिसांना सांगितले की, या सरकारी क्लार्कने तिला अश्लिल मेसेज पाठविले. यामध्ये त्याने म्हटले की मी तुझ्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. त्या बदल्यात मला देखील तुझ्याकडून काही हवे आहे. पोलिसांनी या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कानपूरच्या विकास भवनात नोकरीच्या शोधात अनेकजण येतात. मात्र, तेथील कर्मचारी विनोद मिश्राने जो प्रकार केला आहे ते ऐकून आता क्वचितच एखादी तरुणी तिथे नोकरी मागण्यासाठी जाईल.

धक्कादायक म्हणजे या विनोद मिश्राने तिला सांगितले की, जी तरुणी माझी इच्छा पूर्ण करते तिलाच मी नोकरीला लावतो. अशा प्रकारचे मेसेज तिला करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

पीडित तरुणीने सांगितले की, विकास भवनात अर्ज देण्यासाठी गेल्यावर तिथे विनोद मिश्रा नावाचा सरकारी क्लार्क होता. त्याने माझा मोबाईल नंबर घेतला आणि नोकरी लावणार असल्याचे सांगितले.

यानंतर ती घरी निघून आली. यानंतर त्या मिश्राचे तिला मोबाईलवर अश्लिल मेसेज यायला लागले. जेव्हा तिने यास विरोध केला तेव्हा त्याने हे ठीक नाहीय, मी तुझ्या नोकरीसाठी प्रयत्न करतोय तर मलाही तुझ्याकडून काहीतरी हवेय, असे सांगितले.

आरोपी विकास भवनाच्या कृषी विभागात क्लार्क आहे. नोकरीच्या शोधात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याशीच बोलावे लागते. तरुणीने त्याच्यावर अश्लिल व्हिडीओ पाठविल्याचाही आरोप केला आहे.

काही व्हिडीओमध्य़े तो स्टेज डान्सही करताना दिसत आहे. क्लार्कने केलेल्या या प्रकारामुळे तरुणीलाही धक्का बसला आहे. त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.