FlashBack 2020 : सुशांतची आत्महत्या की...?; गल्ली ते दिल्लीच नव्हे, जगात झाली चर्चा

By पूनम अपराज | Published: December 24, 2020 08:17 PM2020-12-24T20:17:57+5:302020-12-24T21:18:48+5:30

Flashback 2020 : २०२० हे वर्ष कधी आलं आणि कधी सरलं हे कळलंच नाही. मात्र, बहुतांश लोकांच्या तोंडी २०२० वर्ष हे भयानक तर काहींना हे वर्ष सकारात्मक ठरलं. या वर्षाने एकीकडे कोरोना वायरसने अख्या जगाला हादरवून टाकलं तर दुसरीकडे २०२० हे वर्षे बॉलीवूड इंडस्ट्रीसाठी खूप निराशाजनक ठरलं.

मार्च महिन्यात कोरोनाने धीम्या गतीने भारतासह अनेक देशांत प्रवेश केला आणि लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. प्रवास बंद असल्याने वर्क फ्रॉम होम सुरु झालं. कुटुंबातील कलह वाढू लागले. त्यातच कोरोना संक्रमित होणाऱ्यांचे वाढते आकडे काळजाचा ठोका चुकवत होते. त्यातच मे महिन्यात बॉलीवूडला हादरवून टाकणारी घटना घडली. ती म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची घटना. 

डिप्रेशनमुळे सिनेसृष्टीतील अनेक स्टार्सनी सुसाईड करून आपलं जीवन संपवून टाकलं. त्यांनी असं अचानक टोकाचं पाऊल उचल्यामुळे फिल्मइंडस्ट्री हादरून गेली. वर्क स्ट्रेस, एकाकीपणा, अशा अनेक कारणांमुळे हे सुसाईड सत्र चर्चेत राहिलं. १४ जून २०२० हा दिवस बॉलीवूडसाठी एक ब्लॅक डे ठरला. कारण याच दिवशी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्याची न्यूज टेलिव्हिजन चॅनलपासून व्हाट्सअप, फेसबुकपर्यंत वायरल होऊ लागली आणि अख्खं बॉलीवूड हादरलं

काळजाला चटका लावून जाणारी ही घटना. ज्याच्या चेह-यावर नेहमी हास्य असायचं असा एक बॉलिवूडमधला तारा एकाकी नैराश्याचं जीवन जगत असेल असं कोणाला वाटलं देखील नव्हतं. मात्र हीच ही मायानगरी दुनिया आहे. इथे जसं दिसत तसं नसतं.

सुशांतच्या आत्यहत्येमुळे त्याची फॅमेली, फ्रेन्ड्स, फॅन्स, त्याची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती या सगळ्यांना धक्का बसला. कोणी म्हणत होतं ही सुसाईड होती. तर, कोणी म्हणत होतं हा एक क्राईम सीन होता. या प्रकरणामुळे गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकारण तापलं होतं.

सुशांतच्या मृत्यूपूर्वीच त्याची माजी असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनने देखील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांतचा मृत्यू म्हणजे खूपच संवेदनशील विषय बनत चालला होता. दिशाच्या आत्महत्येमुळे अनेक इनसाईड स्टोरी लाईमलाईटमध्ये आल्या. त्यावरून नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हणत या प्रकरणात उडी घातली. 

सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या होती की हत्या? या दोन मुद्द्यावरून गॉसिप रंगू लागलं. काहींना वाटत होतं की ही आत्महत्या होती. काहींना वाटलं की हत्या. त्यामुळे या मृत्यूबाबत देशासह जगभरात याबाबत चर्चा झाली.  

सुशांतच्या मृत्यूमुळे बॉलीवूडमधलं ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं. सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती सुशांतला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ड्रग्ज देत होती असं चौकशीदरम्यान समोर येताच याप्रकरणी रिया आणि तिचा भाऊ शौविकसह अनेक ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आली. मात्र, त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

सुशांत आत्महत्येमुळे नेपोटिझमचा मुद्दा समोर आला. या वादावर अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट्वर वॉर सुरू करून बॉलीवूडचे बिग डिरेक्टर्स लाईक संजय लीला भन्साळी, करण जोहर, आदित्य चोप्रा यांच्यासह मुंबई पोलिस आणि ठाकरे सरकारला यांना टार्गेट केलं गेलं.

मुंबई पोलिसांनी बॉलीवूडमधील या बिग शॉट्सची कसून चौकशी केली. मात्र, हाती काहीच ठोस पुरावे लागले नाहीत. सुशांत कथित आत्महत्येमुळे राजकारण रंगलं. अगदी मुंबईपासून बिहारपर्यंत. मुंबईत नारायण राणे यांनी सुशांतच्या केसमध्ये आदित्य ठाकरे आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांत हा बिहारचा मुलगा असून त्याच्या आत्महत्येचं प्रकरण हे मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. अर्थात सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार येथे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर बिहार सरकारने केंद्राला पाचारण केले. त्याप्रमाणे मग हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयच्या हाती देण्यात आलं.

सुशांतच्या तपासाची सुई मुंबई पोलीस, सीबीआय आणि नंतर एनसीबीकडे वळली. एनसीबीने बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रध्दा कपूर, सारा अली खान, तसंच अर्जून रामपाल, निर्माता फिरोज नाडियादवालाची पत्नी शबाना, कॉमेडीयन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष यांची कसून चौकशी केली. 

२०२० च्या इंटरनेट सर्च इंजिनमध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या यादीमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत समावेश आहेत. सुशांतच्या कथित आत्महत्येमुळे असे अनेक अँगल समोल आले. मात्र सुशांतच्या केसचं काय ? तर मुंबई पोलिसांप्रमाणेच सीबीआयच्या हातीदेखील सुशांतने हत्या केल्याबद्दल काहीही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत.

सुशांतच्या आत्महत्येप्रमाणेच बीटाऊनमधल्या आणखी काही सेलिब्रिटींच्या आत्महत्या मनाला चटका लावून गेल्या. कहानी घर-घर की फेम समीर शर्माने मुंबईमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. समीर शर्माने अनेक टेलिव्हिजनवरचा एक फेमस चेहरा होता.

तसंच अभिनेता असिफ बसरा, अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे यांच्यानंतर अलिकडेच दाक्षिणात्य अक्ट्रेस वीजे चित्राने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती.

ती केवळ २८ वर्षांची होती. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये चित्राचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती हेमंत यांच्यासोबत चित्राचा साखरपुडा झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी हेमंतला ताब्यात घेतलं. चित्रा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हेमंतवर दाखल झाला आहे. याप्रकराणी सत्य काय आहे हे लवकरच जगासमोर येईल.

एकूणच २०२० या वर्षी जास्त आत्महत्येची प्रकरणं सिनेसृष्टीत दिसून आली. आता २०२१चा पडदा उघडत असताना या नैराश्यातून बाहेर येऊन, नव्या वर्षाचे, नव्या उमेदिने स्वागत करूयात.