PUBG खेळण्यास वडिलांनी केली मनाई, मुलाने चाकूने गळ्यावर केले सपासप वार 

By पूनम अपराज | Published: October 16, 2020 03:07 PM2020-10-16T15:07:18+5:302020-10-16T15:17:32+5:30

Stabbing : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेत वडिलांनी आपल्या मुलाला PUBG खेळण्यास रोखले म्हणून मुलाने वडिलांच्या गळ्यावर वार केले आणि चाकूने स्वत: ला जखमी केले. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील आहे.

मोबाईलच्या गेमची नशा तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यासाठी तरुण काहीही करण्यास तयार असतात. मेरठमध्येही असेच भयानक प्रकरण समोर आले आहे. (All Photos - Aaj tak)

मोबाईलच्या गेमची नशा तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यासाठी तरुण काहीही करण्यास तयार असतात. मेरठमध्येही असेच भयानक प्रकरण समोर आले आहे.  जिथे वडिलांनी मुलाला मोबाईलवर PUBG  गेम खेळण्यापासून रोखले होते, त्यामुळे डोकं फिरलेल्या मुलाने आपल्या वडिलांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले.

इतकेच नव्हे तर यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करुन जखमी करून घेतले. त्यानंतर हळहळ व्यक्त झाली व दोघांनाही तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या खरखौदा परिसरातील एवन कॉलनीत आमिर नावाचा एक तरुण मोबाईलवर PUBG  गेम खेळत होता. वडिल इरफानने आमिर या मुलाला मोबाईलवर गेम्स खेळण्यापासून रोखले, नंतर त्याने प्रथम वडिलांसोबत शाब्दिक बाचाबाची केली, त्यानंतर त्याने घरात पडलेल्या चाकूने वडिलांच्या गळ्यावर वार केले.

वडिलांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ पसरली होती, त्यानंतर आमिरनेही स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार केले. जवळच्या लोकांनी दोघांनाही मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. सध्या मुलाची प्रकृती चिंताजनक असून जीवन व मृत्यूची लढाई लढत आहे. मुलगा अमीरही मानसिक रुग्ण असून मानसिक उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read in English