क्रौर्याचा कळस, नरभक्षक वेटरने आईचे १०० तुकडे केले, पाळीव कुत्र्यासोबत मिळून खाल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:34 PM2021-04-23T13:34:21+5:302021-04-23T14:12:36+5:30

cannibal waiter in spain killed his mother : एक नरभक्षक माणसाने आई मुलाच्या नात्याला आणि मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक समोर आली आहे. या व्यक्तीने आधी आपल्या आईची हत्या केली. त्यानंतर हे तुकडे लंच बॉक्समध्ये टाकून नंतर त्याने स्वत: खाल्ले. तसेच कुत्र्यालाही खाऊ घातले.

एक नरभक्षक माणसाने आई मुलाच्या नात्याला आणि मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना स्पेनमध्ये घडली आहे. या व्यक्तीने आधी आपल्या आईची हत्या केली. त्यानंतर त्याने मृत आईच्या शरीराचे कापून हजारो तुकडे केले. हे तुकडे लंच बॉक्समध्ये टाकल्यानंतर त्याने स्वत: खाल्ले. तसेच कुत्र्यालाही खाऊ घातले.

२८ वर्षीय आरोपी एल्बर्टो सांचेझ गोमेझ हा एक बेरोजगार वेटर आहे. तो माद्रिद येथे वास्तव्यास आहे. सांचेजच्या घरी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्याची ६८ वर्षीय आई मारिया गोमेझ हिच्या शरीराचे काही तुकडे फ्रिज आणि प्लॅस्टिक बॅगेत सापडले. रिपोर्ट्सनुसार आता गुन्हा सिद्ध झाल्यासा सांचेझ याला १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

मारिया गोमेझ हिच्या एका मैत्रिणीने तिच्या बेपत्ता होण्याबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर या घटनेची खबर पोलिसांना लागली. त्यानंतर पोलिसांनी मारिया हिच्या घरी येऊन तपास केला असता सांचेझ याने अगदी सहजपणे आला गुन्हा कबूल केला.

पोलीस गोमेझच्या घरी पोहोचल्यावर सांचेझने दरवाजा उघडला आणि माझी आई इथेच आहे आणि तिची मृत्यू झाला आहे, असे सांगितले. तसेच मी आणि माझ्या कृत्र्याने तिचे संपूर्ण शरीर खाल्ले, असा दावाही त्याने केला. दरम्यान सांचेझने दिलेली कबुली ऐकून पोलिसांना धक्का बसला. आईसोबत झालेल्या किरकोळ भांडणानंतर त्याने तिची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

सांचेझला अटक करण्यात आली आहे. त्याने चौकशीत सांगितले की, टीव्ही बघत असताना आईला ठार मारले पाहिजे असे आवाज ऐकू यायचे. हे आवाज कधीकधी शेजारी, कधी सेलेब्रिटी तर कधी टीव्हीतून ऐकू यायचे.

मात्र मी माझ्या आईला मारल्यानंतर कधी तिचे मांसभक्षण केले, हे मला आठवत नाही, असे त्याने सांगितले. दरम्यान, या व्यक्तीच्या अजब जबाबांनंतर पोलिसांनी त्याच्या मानसिक स्थितीबाबत जाणून घेण्यासाठी त्याला रुग्णालयात नेऊन तपासणी सुरू केली आहे. सांचेझच्या सायकोलॉजिकल टेस्ट करून त्याला काही मानसिक आजार तर नाही ना, याचा तपास करण्यात येणार आहे.

Read in English