Aryan Khan Drugs Case: NCB ची मोठी तयारी; रिया च्रकवर्तीसारखाच आर्यन खान देखील तुरुंगात अडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:01 PM2021-10-18T17:01:04+5:302021-10-18T17:15:38+5:30

Aryan Khan Drugs Case and Rhea Chakraborty has many similarities आर्यन खानच्या वकिलांना तो जामिनावर बाहेर येईल अशी आशा आहे, तर सरकारी वकिलांनी तो कसा आत राहिल याची फिल्डिंग लावली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मुंबई क्रूझ ड्रग्ज रेव्ह पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अटकेत आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कैदी नंबर 956 आर्यन खानच्या जामिन अर्जावरील सुनावणीवर बुधवारी निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे.

आर्यन खानच्या वकिलांना तो जामिनावर बाहेर येईल अशी आशा आहे, तर सरकारी वकिलांनी तो कसा आत राहिल याची फिल्डिंग लावली आहे. दोन दिवस जामिनावर सुनावणी सुरु होती. तरीदेखील आर्यन खानच्या वकिलांना त्याला जामिन देण्यास अपयश आले. शाहरुख खानने त्यासाठी वकीलही बदलला.

अशावेळी नार्कोटिक्स डिपार्टमेंटने (NCB) मोठी तयारी सुरु केल्याचे समजत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput Drugs Case) मृत्यूनंतर खरेतर बॉलिवूडमधील ड्रग्जचे जाळे समोर आले होते. त्यावेळी मोठमोठ्या हिरोईन, हिरो आणि अन्य लोकांना अटक झाली होती. हाच फास आता आर्यन खान भोवती आवळला जाण्याची शक्यता दिसत आहे.

रिया च्रकवर्ती (Rhea Chakraborty) आणि आर्यन खान यांच्यात मोठे साम्य आहे. एनसीबीने रिया विरोधात असे कोणतेही पुरावे नसताना अनेक महिने तिला तुरुंगात ठेवले होते. तशाचप्रकारे एनसीबी आर्यनलादेखील काही महिने आत ठेवण्याची तयारी करत असल्याचे वाटत आहे.

सुशांत प्रकरणी एनसीबीला व्हॉट्स अॅपवर ड्रग्ज संबंधी चॅट मिळाले होते. यामुळे रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक झाली होती. रियाला न्यायालयाने जामिन दिला नाही, तिला भायखळा तुरुंगात एक महिना कैदी बनून रहावे लागले.

आर्यन असेल की रिया, दोघांकडेही एनसीबीला ड्रग्ज सापडले नव्हते. नाही दोघांच्या ब्लड टेस्टमध्ये ड्रग्जचे नमुने आढळले होते. म्हणजे दोघेही ड्रग्ज सेवन किंवा हाताळणी प्रकरणी क्लिअर होते. एनसीबीच्या पंचनाम्यात आर्यनने त्या रात्री क्रूझवर ड्रग्ज घेतल्याचे मान्य केले आहे.

दोन्ही प्रकरणांची पडताळणी केली तर एनसीबीने केलेली चौकशी, न्याय़ालयात केलेले सादरीकरण आणि न्यायधीशांसमोर केलेला युक्तीवाद पाहता सारे काही एकसारखे आहे. एनसीबीकडून एएसपी अनिल सिंह सतत ड्रग्ज चॅटचा उल्लेख करत आहेत. एनसीबीने आर्यन, रिया या दोघांना आधी ताब्यात घेतले होते. दोघांचे फोन जप्त करून व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारावर अटकही केली होती.

आर्यन खानला 20 ऑक्टोबरला जामिन मिळेल किंवा नाही, हे वेळच सांगले. पंतू रियाच्या केसमध्ये एक असा तर्क दिला गेला होता तो आर्यनच्या केसमध्ये देखील होता. प्रसिद्ध हस्ती या समाजाच्या रोल मॉडेल असतात, यामुळे समाजाच्या प्रती त्यांची जबाबदारी मोठी असते. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामिन देताना हा तर्क फेटाळला होता. यावेळी म्हटले होते की, कायद्यासमोर सर्व लोक समान असतात, आम्ही याच्याशी सहमत नाही.

रियाचे चॅट रिया ही ड्रग्ज खरेदीमध्ये थेट सहभागी होती हे दर्शवितात. आर्यनवर देखील असेच आरोप करण्यात आले आहेत. आणि या बाबी दोघांच्याही एफआयआरमध्ये नोंद आहेत.