युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा यांच्या लग्नाचा शाही थाट, पाहा फोटो

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे मंगळवारी लग्नाच्या बंधनात अडकले. चहरनं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्रीचा याच वर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा पार पडला होता.

आयपीएल 2020 दरम्यान धनश्रीदेखील चहलबरोबर यूएईमध्ये उपस्थित होती. एवढेच नाही तर ती सामन्यांदरम्यान चहलच्या टीम रॉयल चॅलेन्जर्स बँगळुरूला सपोर्ट करताना दिसत होती.

चहल आणि धनश्री यांचे चाहते दोघांच्या लग्नानंतर अत्यंत आनंदी दिसत आहेत. तसेच त्यांच्या फोटोवर कमेंट देखील करत आहेत.

धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. एवढेच नाही तर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. इंस्टाग्रामवरही धनश्रीचे पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत.