WTC Final 2021 IND vs NZ : रॉस टेलरनं जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंक्तित पटकावले स्थान

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची भारत-न्यूझीलंड फायनलच्या पाचव्या दिवसाचा खेळ एक तास उशीरानं सुरू झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन व सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलर सध्या खेळपट्टीवर जम बसवून होते. मोहम्मद शमीनं टेलरला बाद केले.

मोहम्मद शमीनं त्याच्या पहिल्याच षटकात स्वींग गोलंदाजी करून किवी फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. इशांत शर्मानं डाव्या बाजूला टाकलेला चेंडू छेडण्याचा मोह टेलरला महागात पडला असता, रिषभ पंतनं झेल टिपण्यासाठी दमदार प्रयत्न केला, परंतु त्याची झेप अपुरी ठरली.

या सामन्यात रॉस टेलरनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून असा विक्रम सर्वात प्रथम सचिन तेंडुलकरनं केला होता अन् न्यूझीलंडकडून हा भारी पराक्रम आज टेलरनं करून दाखवला. टेलरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावा पूर्ण केल्या आणि न्यूझीलंडकडून हा मैलाचा दगड सर करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.

रॉस टेलरनं १०७ कसोटींत ७५०६* धावा केल्या आहेत. २३३ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ८५८१ धावा, तर १०२ ट्वेंटी-२०त १९०९ धावा आहेत.

भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी १८ हजार + आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम केला आहे.

श्रीलंकेकडून कुमार संगकारा, माहेला जयवर्धने व सनथ जयसूर्या यांनी हा विक्रम केला.

दक्षिण आफ्रिकेसाठी जॅक कॅलिस, एबी डिव्हिलियर्स व हाशिम आमला यांनी १८ हजार + धावा केल्यात.

वेस्ट इंडिजसाठी ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल व ख्रिस गेल

ऑस्ट्रेलियासाठी रिकी पाँटिंग व स्टीव्ह वॉ

पाकिस्तानकडून इंजमाम उल हक हा एकमेव फलंदाज आहे.