शिखर धवनबाबत नेमकं घडलं तरी काय....

भारताचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होता. या सामन्यात धवनने शतकी खेळी साकारली होती.

धवनने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती.

या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता.

धवन 10-12 दिवसांत फिट होईल, असे संघातील प्रशिक्षकांनी सांगितले होते.

आज धवन विश्वचषकात खेळणार नाही, हा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला.

धवनच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.