हरभजन सिंग स्वित्झर्लंडमध्ये नेमकं करतोय तरी काय...

हरभजनने आपले स्वित्झर्लंडमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

हरभजन हा स्वित्झर्लंडमध्ये नेमकं करतोय तरी काय, हा प्रश्न आता बऱ्याच जणांना पडलेला आहे.

कारण स्वित्झर्लंडमध्ये कोणतीही स्पर्धा नाही किंवा समालोचनाचे काम नाही.

त्यामुळे हरभजन स्वित्झर्लंडमध्ये करतोय तरी काय, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

हरभजन भारतीय संघात नाही, पण तरीही त्याने निवृत्ती जाहीर केलेली नाही.

पण तरीही हरभजन समालोचन करताना दिसतो. सध्याच्या घडीला तो विश्रांती घेत आहे.

सुट्टी घालवण्यासाठी हरभजनने स्वित्झर्लंडचा पर्याय निवडला असून काही फोटो त्याने शेअरही केले आहेत.