विराट कोहलीच्या नवीन घड्याळाची किंमत एवढी की निघेल पाकिस्तानी क्रिकेपटूचा दीड महिन्याचा पगार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वाधिक 100 श्रीमंत खेळाडूंमध्ये असलेला एकमेव क्रिकेटपटू अन् भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा पगार, विविध ब्रँड्समधून मिळणारं उत्पन्न याप्रमाणे त्याची लाईफस्टाईलही हायफाय आहे.

विराटनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात मुंबईतील मान्सूनच्या आगमचा अल्हाददायी आस्वाद घेत विराट पुस्तक वाचत आहे. त्या फोटोत दिसणाऱ्या घड्याळाची चर्चा अधिक रंगताना पाहायला मिळत आहे.

विराटच्या घड्याळाची किंमत इतकी आहे की, त्यातून पाकिस्तानच्या A ग्रेडच्या क्रिकेटपटूचा दीड महिन्याचा पगार निघेल.

लॉकडाऊनमुळे क्रिकेट स्पर्धा होत नसल्यामुळे विराट त्याच्या मुंबईच्या घरात पत्नी अनुष्का शर्मासोबत आहे. मागील तीन महिन्यांच्या काळात विराट सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना अपडेट्स देत आहे.

इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून तो फॅन्सशी संवाद साधत आहे. फोर्ब्स मॅगझीननं नुकतेच जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा अव्वल 100 मध्ये आहे. 196 कोटींसह तो या क्रमवारीत 66 व्या स्थानावर आहे.

इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील सेलिब्रेटींमध्ये विराटनं मानाचं स्थान पटकावलं आहे. भारताचा स्टार विराट पाचव्या क्रमांकावर आहे. तो वर्षाला 123 कोटी 61,06,601 इतके कमावतो.

एका पोस्टमागे तो 2 कोटी 20,59,748 इतके कमावतो. विराटनं लॉकडाऊनमध्ये 3 स्पॉन्सर पोस्ट केल्या आणि त्यातून त्याला ही रक्कम मिळाली. त्यानं एका पोस्टसाठी सरासरी 1.2 कोटी रुपये कमावले. इंस्टाग्रामवर कोहलीचे 6.2 कोटी फॉलोअर्स आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( पीसीबी) नुकताच त्यांच्या 21 खेळाडूंचा सेंट्रल करार जाहीर केला. बाबर आझम, अझर अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना सर्वाधिक पगाराच्या पंक्तित बसवण्यात आले आहे.

ए ग्रेडमध्ये समावेश असलेल्या या तीनही खेळाडूंना महिन्याला 5 लाख 16,489 रुपये पगार दिला जातो. विराटच्या या नव्या घड्याळाच्या किमतीत पाकिस्तानी खेळाडूचा दीड महिन्याचा पगार नक्की निघेल.

विराटनं इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याच्या हातात नवीन घड्याळ दिसत आहे. विराटच्या या घड्याळाची किंमत जवळपास 8 लाख 60,700 इतकी आहे.