विराट कोहलीनं 'देसी गर्ल'ला टाकलं मागे; बनला इंस्टाग्रावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला भारतीय!

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेटपटूच्या फॉलोअर्सची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा मोठा चाहतावर्ग आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सोमवारी स्वतःच्या नावावर एक वेगळा विक्रम नोंदवला. पण, हा विक्रम क्रिकेटच्या मैदनावर नाही, तर सोशल मीडिया इंस्टाग्रावरचा आहे.

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीयांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. इंस्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या ही 70.1 मिलियन आहे.

70 मिलियनचा पल्ला पार करणारा कोहली हा पहिलाच भारतीय आहे. त्यामुळे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या टॉप 10 भारतीय सेलिब्रेटिंमध्ये एकमेव खेळाडू आहेत.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचे 55.4 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ श्रद्धा कपूरचा क्रमांक येतो. तिचे 51.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

लॉकडाऊनच्या काळात इंस्टाग्रामवर पोस्ट करून सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील टॉप टेन खेळाडूंमध्ये विराट हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

इंस्टाग्रामवर कोहलीचे 7 कोटी 1 लाख 48 हजार फॉलोअर्स आहेत आणि तो केवळ 171 लोकांना फॉलो करतो.

Read in English