विरुष्काची जोडी ठरली लय भारी; दिग्गज फुटबॉलपटू अन् त्याच्या पत्नीवर केली मात

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेटपटूच्या फॉलोअर्सची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा मोठा चाहतावर्ग आहे.

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. इंस्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या ही 70.1 मिलियन आहे.

दुसरीकडे विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचाही मोठा फॉलोअर्स आहे. अनुष्काचे इंस्टाग्रामवर 40 मिलियन फॉलोअर्स आहेत.

विराट आणि अऩुष्का इस्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतात आणि त्यांच्या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स व कमेंट्सही मिळतात.

विराट-अनुष्काच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या ही 110.1 मिलियन इतकी झाली आहे.

विरुष्कासारखेच इंस्टाग्रामवर डेव्हिड बेकहॅम व त्याची पत्नी व्हिक्टोरिया यांचाही बोलबाला आहे.

पण, विरुष्का जोडीनं दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड अन् व्हिक्टोरिया यांना इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत मात केली आहे.

डेव्हिड अन् व्हिक्टोरिया यांचे इंस्टाग्रामवर मिळून 92.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. यापैकी डेव्हिडच्या फॉलोअर्सची संख्या ही 63.8 मिलियन आहे, तर व्हिक्टोरियाचे 28.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

फोर्ब्सच्या माहितीनुसार विराट कोहलीचे मागील वर्षातील एकूण उप्तन्न 196 कोटी इतके आहे.