वनडे मालिकेत पराभूत झाल्यावरही विराट कोहली - अनुष्का शर्मासह संघाने केली सुट्टी एन्जॉय; फोटो झाले वायरल

Published: February 15, 2020 04:26 PM2020-02-15T16:26:53+5:302020-02-15T16:33:50+5:30

सुट्टी एन्जॉय करत असताचे काही फोटो चांगलेच वायरल झाले आहेत. या फोटोमध्ये विराटच्या बाजूला अनुष्का दिसत आहे. अनुष्का शर्माने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि हाफ पँट घातली आहे, तर विराटने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि हाफ पँट घातली आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनीही आपले खास फोटो शूट केल्याचे पाहायला मिळाले.

भारताच्या कसोटी संघात दाखल झालेल्या चेतेश्वर पुजाराने एक खास सेल्फी काढला. पण या सेल्फीमध्ये विराट आणि अनुष्का कुठेच दिसत नाहीत...

भारताच्या खेळाडूंबरोबर सपोर्ट स्टाफही भटकंतीसाठी गेला होता. यावेळी पृथ्वी शॉ आणि जसप्रीत बुमराबरोबर त्यांनी खास सेल्फी काढला...

फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलनेही या छोट्या पिकनिकमध्ये भरपूर धमाल केली. बऱ्याच फोटोमध्ये राहुल दिसलेला नाही. पण या फोटोनुसार राहुल भारतीय संघाबरोबर असल्याचे दिसत आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी एक खास पोझ दिली.

भारतीय कसोटी संघातील सलामीवीर मयांक अगरवालने शांत ठिकाणी आपला एक फोटो काढला आहे. हा फोटो त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि अन्य सपोर्ट स्टाफने आपला खास फोटो यावेळी काढला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!