Vijay Hazare Trohpy 2021 : चार सामन्यांत चोपल्या ४२७ धावा, विजय हजारे स्पर्धेत हा युवा फलंदाज चर्चेत

Vijay Hazare Trohpy 2021 : एकीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत विजय हजारे करंडक स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत आपले लक्ष वेधून घेतले आहे. (Devdutt Paddikal shone in the Vijay Hazare Trophy)

एकीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत विजय हजारे करंडक स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत आपले लक्ष वेधून घेतले आहे.

विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay Hazare Trohpy 2021) कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पड्डिकल (Devdutt Padikkal) याने जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात देवदत्तने ४२७ धावा कुटून काढत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

कर्नाटकचा डावखुरा सलामीवीर असलेल्या देवदत्तने पुन्हा एकदा आपण किती गुणवान आणि दर्जेदार फलंदाज आहोत हे सिद्ध केले आहे. आयपीएल २०२१ पूर्वी देवदत्त पड्डिकलने चार सामन्यात दोन शतके फटकावली आहेत. तसेच एकूण ४२७ धावा फटकावल्या आहेत.

शुक्रवारी केरळविरुद्ध झालेल्या सामन्यात देवदत्त पड्डिकल याने नाबाद १२६ धावा फटकावल्या. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. १२६ धावांच्या या खेळीत देवदत्तने १३ चौकार आणि २ षटकार ठोकले. या तुफानी खेळीच्या जोरावर कर्नाटकने केरळला ९ विकेट्स राखून पराभूत केले.

दरम्यान, पड्डिकलने ओदिशाविरुद्धच्या सामन्यात १५२ धावांची खेळी केली होती. या दोन शतकी खेळींच्या जोरावर देवदत्त पड्डिकलने चार सामन्यांमध्ये १४२.३३ च्या सरासरीने ४२७ धावा फटकावल्या आहेत. देवदत्त पड्डिकल २०२० च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता. आता बंगळुरूने यंदाच्या हंगामासाठी त्याला संघात कायम ठेवले आहे.

देवदत्त पड्डिकलप्रमाणेच मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आणि बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्याही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कृणालनेसुद्धा या स्पर्धेत चार सामने खेळताना २ शतकांसह ३८६ धावा फटकावल्या आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर आणि मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ यानेही स्पर्धेत एक शतक आणि एका द्विशतकासह ३६६ धावा फटकावल्या आहेत.

Read in English