आफ्रिकन गोलंदाज झाला Emotional; सामना संपल्यावर सहकुटुंब घेतली खेळाडूंची भेट!

इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली

इंग्लंडच्या पहिल्या डावातील 269 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेनं 223 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसरा डाव 8 बाद 391 धावांवर घोषित करून 438 धावांचे लक्ष्य ठेवले.

आफ्रिकेचा दुसरा डाव 248 धावांवर गुंडाळून इंग्लंडने 189 धावांनी विजय मिळवला.

केप टाऊन येथे झालेल्या या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज व्हेर्नोन फिलेंडर यानं पत्नी व मुलासह सर्व क्रिकेटपटूंची भेट घेतली.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी फिलेंडरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

या मालिकेतील दुसरा सामना हा फिलेंडरच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात आला.

घरच्या मैदानावर अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना फिलेंडर भावूक झाला होता. आफ्रिका संघाला त्याला विजयाची भेट देता आली नाही.

हा सामना पाहण्यासाठी फिलेंडरचं कुटुंब उपस्थित होते आणि सामन्यानंतर त्यानं कुटुंबियांसह सर्व खेळाडूंच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

2018मध्ये फिलेंडरनं मेंडीसह विवाह केला. त्याच वर्षी या दोघांनी पुत्ररत्न प्राप्ती झाली.

फिलेंडरनं 62 कसोटी सामन्यांत 1725 धावा, तर 222 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 30 सामन्यांत 41, तर 7 ट्वेंटी-20 सामन्यांत 4 विकेट्स आहेत.