TikTok स्टारला करायचेय लोकेश राहुलशी लग्न; तिचे फोटो पाहून व्हाल 'बोल्ड'!

भारतीय संघाचा स्टार फलंदाज लोकेश राहुल आणि सुनील शेट्टीची कन्या अथिया यांच्या प्रेमाच्या चर्चा जोर धरत आहेत.

ही दोघं सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर लाईक्स-कमेंट्स करत असतात... त्यातून या दोघांच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आले आहे.

अथिया आणि राहुल यांचे एकत्र असलेले फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या. पण, अजूनही दोघांपैकी एकानेही प्रेमाची कबुली दिलेली नाही.

आता या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आली आहे. TikTok स्टार निशा गुरगैन हिनं लोकेश राहुलशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एका लाईव्ह चॅटमध्ये निशानं आपल्या फॅन्स समोर क्रिकेटर क्रश बद्दल सांगितले.

टीम इंडियाचा फलंदाज लोकेश राहुलची ती फॅन असल्याचे तिनं सांगितले.

इतकेच नव्हे तर तिनं राहुलशी लग्न करण्याची इच्छा असल्याचेही सांगितले होते.

टिकटॉकर डॅनिश झेहेनसोबत निशाचे नाव जोडले गेले आहे.

23 वर्षीय निशाचे 20 लाखाहून अधिक फॅन आहेत. इंस्टाग्राम अकाउंटवर तिला जवळपास 2 मिलियन लोक फॉलो करतात.

निशाही ही मुळची नेपाळची, परंतु तिचा जन्म 1997मध्ये मुंबईत झाला.