धोनीसह या पाच दिग्गजांना कसोटीचं शतक पूर्ण करता आलं नाही

पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद युसूफला कारकीर्दीत केवळ 90 कसोटी सामने खेळता आले. ज्यामध्ये 24 शतकं आणि 33 अर्धशतकं आहेत.

भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी कारकीर्दीत 90 सामने खेळले, ज्यामध्ये 38 च्या सरासरीने त्याने 4876 धावा केल्या. यामध्ये सहा शतकं आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 99 कसोटी सामन्यांच्या 147 डावांमध्ये त्याने 6215 धावा केल्या, ज्यामध्ये 22 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर अॅडम गिलख्रिस्टने एकूण 96 कसोटी सामने खेळले आणि यामध्ये 47.60 च्या सरासरीने 5570 धावा केल्या. या धावांमध्ये 17 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोसने 98 कसोटी सामने खेळल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. 21 च्या सरासरीने त्याने कसोटीमध्ये 405 विकेट घेतल्या.