भारताच्या विजयाचे 'हे' आहेत पाच शिलेदार

1. रोहित शर्मा : रोहितने या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्यामुळेच त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

2. मयांक अगरवाल : भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने या सामन्याच्या पहिला डावात द्विशतक झळकावले. त्यामुळे संघाला पाचशे धावांचा डोंगर उभारता आला.

3. आर. अश्विन : फिरकीपटू आर. अश्विनने या सामन्यात दमदार गोलंदाजी केली. पहिल्या सात बळी मइळवत अश्विनने चमकदार कामगिरी केली. या सामन्यात अश्विनने 350 बळींचा टप्पा गाठला.

4. रवींद्र जडेजा : जडेजाने पहिल्या डावात जलदगतीने 40 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने चार बळी मिळवले. या चारपैकी तीन बळी जडेजाने एकाच षटकात पटकावले.

5. मोहम्मद शमी : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पहिल्या डालात एकही बळी मिळवता आला नव्हता. पण दुसऱ्या डावात मात्र शमीने पाच बळी मिळवण्याची किमया साधली