टीम इंडियाच्या ओपनरनेच पटवली विकेटकिपरची बायको...

भारतीय संघातील दोन खेळाडूंमध्ये सध्या वैमनस्य आहे. कारण भारताच्या एका ओपनरनेच विकेटकिपरची बायको पळवल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचे लग्न 2007 साली निकिता बंजाराशी झाले होते.

निकिता ही कास्टिंग आर्टिस्ट आहे. दिनेश आणि निकिता या दोघांचेही वडिल चांगले मित्र होते. त्यामुळे हे लग्न झाले.

निकिता आणि दिनेश यांचे लग्न पाच वर्षे टिकले. कारण दिनेशबरोबर लग्न झाल्यावर काही वर्षांमध्य तिचे संघातील ओपनरबरोबर अफेअर सुरु झाले होते.

दिनेशला निकिताच्या अफेअरबाबत कुणकुण होती. पण जेव्हा निकिताने घटस्फोटाची मागणी केली, तेव्हा दिनेशचे या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले.

दिनेश आणि निकिता यांचे लग्न पाच वर्षे टिकले. त्यानंतर निकिताने भारताचा सलामीवीर मुरली विजयबरोबर लग्न केले.

निकिताने मुरली विजयबरोबर लग्न केल्यानंतर दिनेश निराशेच्या गर्तेत अडकला होता. त्यावेळी त्याच्यापुढे भारताची स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलचा चेहरा आला आणि तो तिच्या प्रेमात पडला.

दिनेश आणि दीपिका एकाच जिममध्ये व्यायाम करायला जायचे. तिथे त्यांची ओळख झाली.

दिनेशला दीपिका आवडायला लागली आणि त्याचे तिच्यावर प्रेम जडले. दिनेशने एकदा दीपिकाला डेटवर बोलावले होते. पण त्यावेळी दीपिका डेटवर गेली नव्हती.

जिममध्ये बराच काळ एकत्र घालवल्यावर दिनेशने दीपिकाला प्रपोज केले आणि दोघांचे अफेअर सुरु झाले.

दोघेही आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे काही वर्षांनी दिनेशने दीपिकाशी दुसरे लग्न केले.