कोहलीची जबरदस्त फॅन आहे ही पाकिस्तानी तरुणी; म्हणाली...विराट माझाच!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे यात काहीच दुमत नाही. पण भारतीय खेळाडूंचेही जगभरात अनेक चाहते आहेत. यात केवळ भारतीयच नव्हे, तर इतर देशातील क्रिकेट चाहतेही भारतीय खेळाडूंचे फॅन्स आहेत. अशाच एका जबरा फॅन बद्दल जाणून घेऊयात...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं नाव अशा स्टार क्रिकेटपटूंमध्ये घेतलं जातं की ज्याचे केवळ भारतीय क्रिकेट चाहते नव्हे, तर इतर देशांचे नागरिक देखील कोहलीचे फॅन्स आहेत. कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

कोहली त्याच्या फलंदाजी शैलीसोबत स्मार्ट लूक्ससाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. विशेषत: तरुणींमध्ये कोहलीची क्रेझ पाहायला मिळते. कोहलीच्या अशाच एका फॅननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

पाकिस्तानची नागरिक असलेली रिजला रेहान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची खूप मोठी चाहती आहे. आशिया चषक २०१८ साली रिजला प्रकाशझोतात आली होती. दुबईमध्ये झालेल्या या स्पर्धेत रिजला पाकिस्तानच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

रिझलाचे सुंदर फोटो त्यावेळी कॅमेरात कैद झाले होते आणि इंटरनेटवर ती खूप चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर २०१९ सालच्या वर्ल्डकप स्पर्धेतही रिजला दिसली.

२०१९ सालच्या वर्ल्डकपवेळी रिजलानं केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिनं कॅमेरासमोर चक्क विराट कोहली मला द्या अशी मागणीच केली होती.

एक अशी कोणती गोष्ट आहे की जी पाकिस्तानच्या संघाला भारताकडून गिफ्ट म्हणून तू देशील? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावेळी तिनं क्षणाचाही विलंब न करता... 'प्लीज, मला विराट द्या, मला तो हवाय', असं उत्तर दिलं होतं.

रिजला २०१९ सालच्या वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीवेळी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. पाकिस्तानचा संघ नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल असा विश्वास असल्यानं मी आधीच तिकीट खरेदी करुन ठेवलं होतं, असं तिनं त्यावेळी सांगितलं होतं.

सोशल मीडियावर रिजला रेहान हिचे हजारो फॉलोअर्स आहेत. रिजला क्रिकेटची खूप मोठी चाहती असून ती आवर्जुन क्रिकेट पाहते आणि त्यासंबंधीच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर टाकत असते.

रिजला मूळची पाकिस्तानच्या कराची येथील असून सध्या ती दुबईमध्ये स्थायिक झाली आहे. रिजला हिला क्रिकेटची खूप आवड असून पाकिस्तानसोबतच ती भारतीय संघाची देखील मोठी चाहती आहे.

Read in English