भारतीय संघाचे दमदार कमबॅक

कर्णधार विराट कोहलीची संयमी खेळी आणि त्याला मिळालेली चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची साजेशी साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत कमबॅक केले आहे.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 49 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. इशांत शर्माने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मुरली विजय (0) त्रिफळाचीत झाला.

जोश हेझलवुडने सहाव्या षटकात लोकेश राहुलचा (2) त्रिफळा उडवला.

चेतेश्वर पुजाराने संयमी खेळ करताना कर्णधार कोहलीसह 74 धावांची भागीदारी केली.

मिचेल स्टार्कने पुजाराला (24) बाद करताना ऑस्ट्रेलियाला तिसरे यश मिळवून दिले.

कोहलीने कसोटीतील 20वे अर्धशतक पूर्ण केले. तो 82 धावांवर खेळत आहे.

अजिंक्य रहाणेनेही कसोटीतील 17वे अर्धशतक झळकावले.

कोहली व रहाणे यांची चौथ्या विकेटसाठी नाबाद 90 धावांची भागीदारी

भारतीय संघाच्या दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 धावा. भारत अद्याप 154 धावांनी पिछाडीवर आहे.