रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सौरव गांगुलीची झाली कोरोना चाचणी, असा आला रिपोर्ट

Sourav Ganguly Health Update : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्यानंतर काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्यानंतर काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान, गांगुलीची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

४८ वर्षीय गांगुलीची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर वुडलँड्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गांगुलीला रुग्णालयातील क्रिटिकल केअर यूनिटमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, सौरव गांगुलीच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला आहे. गांगुलीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

शुक्रवारी वर्कआऊट सेशनदरम्यान, छातीत दुखू लागल्याने तसेच शनिवारी पुन्हा एकदा ही समस्या जाणवल्याने कुटुंबीयांनी गांगुलीला रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, तिथे गांगुलीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील अँटियोप्लास्टी झाली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुलीच्या तीन धमण्यांमध्ये ब्लॉकेज दिसून आले आहे. यामधील एका धमनीमध्ये ९० टक्क्यांपर्यंत ब्लॉकेज आढळले.

दरम्यान, सर्जरीनंतर गांगुलीचा प्रकृती स्थिर आहे. आता डॉक्टर पुढच्या काही दिवसांमध्ये दोन अजून स्टेंटचे प्रत्यारोपण करण्याचा विचार करू शकतात.