Social Viral : हार्दिक-नताशाचा सुपर'हॉट'फोटो!

नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिक पांड्याने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा केला. हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली.

या साखरपुड्यानंतर नताशाने आपले स्वीमसूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

'बादशाह' या म्युझिक व्हिडीओत DJ वाले बावू या गाण्यानं नताशाला प्रसिद्धी मिळवून दिली.

इम्रान हाश्मीच्या The Body या चित्रपटासाठी नव्यानं सादरीकरण करण्यात आलेल्या झलक दिखलाजा या गाण्यात नताशानं डान्स केला होता. 2006 साली अक्सर या चित्रपटातील हे गाणं होतं.

नताशाने मंगळवारी शेअर केलेल्या आणखी एका फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोत तिच्यासोबत हार्दिक पांड्याही दिसत आहेत. या दोघांचा सुपर हॉट फोटो पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.