RR vs DC Latest News : राहुल टेवाटियानं पुन्हा शाहजाह गाजवलं, SRHच्या रशीद खानचा विक्रम मोडला!

Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्या खच्चून आत्मविश्वास भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) कडून राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांची यथेच्छ धुलाई होईल, असेच वाटले होते. पण, स्टीव्हन स्मिथच्या ( Steven Smith) आक्रमक नेतृत्त्वानं DCच्या धावाला लगाम लावली.

जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) पॉवर प्लेमध्ये दोन धक्के दिल्यानंतर DCचा डाव अडखळला. यशस्वी जैस्वालनं ( Yashasvi Jaiswal) भन्नाट क्षेत्ररक्षण करताना दिल्लीच्या कर्णधाराला मागे पाठवले.

शिमरोन हेटमारयनं दिल्लीला मोठ्या धावसंख्येची आस लावली, परंतु कार्तिक त्यागी-राहुल टेवाटिया या जोडीनं त्या मावळून टाकल्या. शारजाह स्टेडियमवर सहज वाटणाऱ्या दोनशे धावांचा पल्लाही दिल्ली कॅपिटल्सला गाठता आला नाही.

शारजाहच्या खेळपट्टीचा अधिक अभ्यास असलेल्या राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) दुसऱ्याच षटकात कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) चा निर्णय योग्य ठरवला.

आर्चरच्या चेंडूवर लेग साईटला टोलावलेला फटका यशस्वी जैस्वालनं शॉर्ट मिडविकेटवर अचूक टिपला. चांगल्या फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ ( 19) यालाही आर्चरनं बाद केले.

पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारणाऱ्या पृथ्वीला दुसऱ्याच षटकात आर्चरने कट अँड बोल्ड केले. DCचा कर्णधार श्रेयस अय्यरला ( 22) सहाव्या षटकात जैस्वालनं भन्नाट थ्रो करून धावबाद केले.

रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) ही जोडी दिल्लीचा डाव सावरताना दिसत होती. पण, स्टीव्ह स्मिथच्या आक्रमक नेतृत्वानं त्यांना मोठे फटके मारण्यापासून रोखून ठेवले होते. त्यात दोघांमधील समन्वय चुकल्यानं रिषभ ( 5) धावांवर धावबाद झाला. दिल्लीला 10 षटकांत 4 बाद 84 धावा करता आल्या.

स्टॉयनिसनं रिषभला कॉल दिला, परंतु तो खेळपट्टीच्या मधोमध आल्यावर स्टॉयनिसनं माघारी पाठवले. ही धाव घेताना रिषभ धावतोय की चालतोच हेच अनेकांना कळले नाही आणि राहुल टेवाटियानं त्याला धावबाद केले. टेवाटियानं RRला मोठी विकेट मिळवून दिली. जोरदार फटकेबाजी करणाऱ्या स्टॉयनिसला त्यानं गुगली चेंडूवर माघारी पाठवले. स्टॉयनिसनं 4 षटकारांसह 39 धावा केल्या. स्मिथनं त्याचा सोपा झेल घेतला.

शिमरोन हेटमायरनं ( Shimron Hetmyer) खणखणीत षटकार खेचले. हेटमायर दिल्लीला मोठी धावसंख्या गाठून देईल, असेच संकेत होते. कार्तिक त्यागीच्या एका षटकात सलग दोन षटकार खेचून त्यानं मनसूबे स्पष्ट केले होते. पण, तिसरा षटकार खेचताना सीमारेषेवर राहुल टेवाटियानं हवेत भरारी घेत झेल टिपला.

हेटमायर 24 चेंडूंत 1 चौकार 5 षटकार खेचून 45 धावांत माघारी परतला. अक्षर पटेलनं ( 17) छोटेखाली, पण महत्त्वपूर्ण खेळी करून दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. दिल्लीला 8 बाद 184 धावा करता आल्या. जोफ्रा आर्चरनं 24 धावांत 3 विकेट्स घेतल्या.

पण, राहुल टेवाटियानं 4 षटकांत 20 धावांत 1 विकेट घेतली. शाहजाहवर मागील पाच सामन्यांतील ही इकॉनॉमिकल गोलंदाजी आहे. याआधी हा विक्रम सनरायजर्स हैदराबादच्या रशीद खानच्या ( 4-0-22-1; 5.50 इकॉनॉमी) याच्या नावावर होता.

टेवाटियानं शारजाह येथे चेन्नईविरुद्ध 37 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या, किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करताना 31 चेंडूंत 53 धावा केल्या होत्या.