पदार्पणातच विक्रम; बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा सुंदर दिसते भारताची 'ही' क्रिकेटपटू

भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिका महिला संघावर वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिलांनी 164 धावांचे लक्ष्य 41.4 षटकांत केवळ 2 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

प्रिया पुनिया आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. स्मृती मानधना दुखापतग्रस्त झाल्यामुळे या सामन्यात प्रिया पुनियाला वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली.

तिनेही संधीचं सोनं करताना अर्धशतकी खेळी केली. 23 वर्षीय प्रियानं नाबाद 75 धावांची खेळी केली. पदार्पणात वन डे सामन्यात अर्धशतक झळकावणारी प्रिया ही सातवी भारतीय महिला फलंदाज ठरली.

6 ऑगस्ट 1996 मध्ये प्रियाचा जन्म झाला आणि वयाच्या 7व्या वर्षापासून तिनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

मुलगी असल्यानं तिला क्रिकेट अकादमीत प्रवेश नाकारण्यात आला. तेव्हा तिच्या वडीलांनी राहतं घर विकून तिच्यासाठी सरावाचं मैदानच तयार केले.

तिनं दिल्लीतील जीजस अँड मेरी कॉलेजमधून कॉमर्समधून पदवी घेतली आहे.

इतर खेळाडूंप्रमाणे तिही अंधश्रद्धाळू आहे आणि म्हणूनच ती प्रथम डाव्या पायातील पॅड घालते.

दी वॉल राहुल द्रविडचा खेळ पाहून ती लहानाची मोठी झाली आणि ती विराट कोहलीला आदर्श मानते

6 फेब्रुवारी 2019मध्ये तिनं न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

महिलांच्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला होता.

क्रिकेट व्यतिरिक्त प्रियाला बॅडमिंटन आणि टेनिस खेळायलाही आवडते.