आता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम

वेस्ट इंडिजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथील सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला.

पंतसमोर कर्णधार विराट कोहली हा खेळपट्टीवर होता आणि भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी संघाला पंतच्या धावांची गरज होती.

पंतच्या गुणवत्तेबाबत आम्हाला काहीच शंका नाही. यापूर्वीच त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.

पंतचे शॉट सिलेक्शन चुकताना पाहायला मिळते. सामन्यामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुसार प्रत्येकाने खेळ करायचा असतो, पण हे पंतला आतापर्यंत जमलेले नाही.

यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर नक्कीच त्याचे संघातील स्थान धोक्यात आहे.

त्यामुळे आता पंतने जर लौकिकाला साजेसा खेळ केला नाही, तर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवता येऊ शकतो.