मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने टाकला गर्लफ्रेंडबरोबरचा किसिंगचा फोटो, कोण आहे तो...

मुंबईच्या संघातील गोलंदाजीची धुरा तो समर्थपणे पेलताना दिसतो.

मुंबईच्या बऱ्याच विजयांमध्ये त्याने आपले योगदान दिले आहे.

आता तर मुंबई इंडियन्सच्या संघाचा तो एक अविभाज्य खेळाडू बनला.

हा खेळाडू नेमका कोण, याची उत्सुकता आता तुम्हाला लागलेली असेल.

न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज मिचेल मॅक्लेघन असे त्याचे नाव आहे.

मिचेल लवकरच प्रेयसी जॉर्जिया इंग्लंड हिच्याशी विवाह करणार आहे.

दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि अखेरीस त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल स्पर्धेदरम्यान मॅक्लेघनला चिअर करण्यासाठी जॉर्जिया भारतात अनेकदा आली होती. या दोघांनी नुकताच साखरपुडा केला.

यावेळी मिचेलने आपल्या गर्लफ्रेंडबरोबरचा किसिंगचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.