MS Dhoni : मेंटॉर महेंद्रसिंग धोनीनं पहिल्याच सराव सत्रात घेतली 'या' तीन खेळाडूंची शाळा, See Photo

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यांत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार आहे.

टीम इंडियानं कालपासून सरावाला सुरुवातही केली. विराट कोहलीचे ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असणार आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीला पुन्हा निळ्या जर्सीत पाहून चाहते भारावले.

बीसीसीआयनं धोनीच्या नव्या भूमिकेतील फोटो पोस्ट केला आणि लिहिलं, ''किंग्सचे मनापासून स्वागत. टीम इंडियात महेंद्रसिंग धोनी परतला आणि तोही नव्या भूमिकेत.''

नव्या भूमिकेत असलेल्या धोनीनं लगेचच टीम इंडियाच्या कच्च्या दुव्यांवर काम करण्यास सुरुवात केली. तंदुरुस्तीशी झगडणाऱ्या हार्दिक पांड्यासह धोनीनं नेट्समध्ये बराच वेळ घालवला.

त्याशिवाय धोनीनं इशान किशन व रिषभ पंत यांना यष्टिंमागील काही टिप्स दिल्या.