MS Dhoni : लूक चेंज करताच धोनी ट्रेंडिंगमध्ये, चाहत्यांकडून माहीचं वेलकम

महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपेक्षा त्याच्या नव्या लूकमुळे आणि करत असलेल्या व्यवसायांमुळेच चर्चेत असतो. आजही धोनीच्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपेक्षा त्याच्या नव्या लूकमुळे आणि करत असलेल्या व्यवसायांमुळेच चर्चेत असतो. आजही धोनीच्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

धोनीचा नवा लूक पाहून चाहतेही खूश झाले असून धोनी हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेंड करत आहे. माही पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये असून त्याची एकदम स्टाईलीश हेअरस्टाईल आहे.

अनेकांनी माहीचे जुन्या हेअरस्टाईलचे आणि नव्या हेअरस्टाईलचे फोटो शेअर केले आहेत. क्रिकेटमधील पदार्पणाच्या काळातील माहीची हेअरस्टाईल पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनाही आवडली होती.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला निवृत्तीचा सामना खेळण्याची संधी मिळायला हवी, असे अजूनही त्याच्या चाहत्यांना वाटते.

भारताला दोन वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कॅप्टन कूल धोनीनं 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून अखेरचा वन डे सामना खेळला.

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करावा लागला. त्यामुळे धोनी पुन्ही ब्लू जर्सीत दिसण्याच्या आशाही मावळत गेल्या अन् अखेर 15 ऑगस्ट 2020 ला धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारासाठी बीसीसीआयनं निरोपाचा सामना आयोजित करावा अशी मागणी आजही होत आहे आणि त्यात एका फोटोमुळे धोनीच्या चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोमवारी टीम इंडियाच्या रेट्रो जर्सीत दिसला. धोनीनं 7 क्रमांकाची रेट्रो जर्सी घातलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले अन् धोनी निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या.

धोनीला पुन्हा ब्लू जर्सीत पाहून त्याचे फॅन्सही भावुक झाले अन् सोशल मीडियावर #MSDhoni हा ट्रेंड सुरू झाला. पण, धोनीनं निरोपाचा सामना खेळण्यासाठी ही तयारी केलेली नाही. एका जाहिरातीच्या चित्रिकरणासाठी धोनीनं ही तयारी केली आहे.

धोनीचा आता व्हायरल होत असलेला नवा लूकही कुठल्यातरी जाहिरातीसाठीचाच आहे, अशी चर्चा रंगली आहे. पण, सोशल मीडियावर माही फिर से छा गया...