Mithali Raj @10,000 : रेकॉर्ड क्वीन मिताली राजच्या नावावरील विक्रम जे मोडणे सहज शक्य नाहीत!

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं ( Mithali Raj) शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावांचा पल्ला पार केला. ( Mithali Raj became the first Indian women cricketer to score over 10,000 international runs )

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं ( Mithali Raj) शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावांचा पल्ला पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारी ती पहिली भारतीय व इंग्लंडच्या चार्लोट एडवर्डनंतर जगातली दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.

१९९९ साली मिलाती राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तिनं २१२ वन डे सामन्यांत ६९७४, ८९ ट्वेंटी-२० सामन्यांत २३६४ आणि १० कसोटींत ६६३ धावा केल्या आहेत. कसोटी आणि वन डेत तिनं ५०+च्या सरासरीनं धावा केल्या आहेत, तर ट्वेंटी-२०त ३७.५२च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडूचा विक्रम मितालीच्या नावावर आहे आणि तिला ७००० धावांचा ट्प्पा गाठण्यासाठी फक्त २६ धावांची गरज आहे. असं केल्यास ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनेल की जिने वन डे क्रिकेटमध्ये ७००० धावा केल्या आहेत.

दोन वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम ( २००५ व २००७) सामने खेळणारी पहिली भारतीय महिला कर्णधार आहे. वन डे क्रिकेटमध्ये तिनं सर्वाधिक ५४ अर्धशतकं झळकावली आहेत. इंग्लंडच्या चार्लोट एडवर्डच्या नावावर ४६ अर्धशतकं आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी पहिली भारतीय आणि जगातील सातवी महिला खेळाडू आहे. २००२मध्ये तिनं इंग्लंडविरुद्ध २१४ धावा चोपल्या होत्या.

वन डे क्रिकेटमध्ये सलग सात अर्धशतकं झळकावणारी पहिली व एमकेम महिला खेळाडू. वयाच्या १६व्या वर्षी तिनं वन डे क्रिकेटमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात शतक झळकावून तिनं पदार्पणात शंभर धावा चोपणाऱ्या युवा महिला खेळाडूचा मान पटकावला. अजूनही हा विक्रम तिच्याच नावावर आहे.

२० वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला आणि २०० वन डे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेटपटूचा मानही मिताली राजनं पटकावला आहे. मिताली राज ही ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा करणारी पहिली महिला खेळाडू आहे.