सचिन, सेहवागशी केली मयांकने बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मयांकने द्विशतक झळकावले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मयांकने शतक झळकावले.

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये मयांकने दोनदा शतकाची वेस ओलांडली आहे.

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये शतकाची वेस ओलांडणारा तो चौथा भारताचा कसोटीपटू ठरला आहे.

मयांकने या सामन्यात शतक झळकावत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरूद्दिन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

आता सलग तिसऱ्या सामन्यात मयांक शतक झळकावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.