IPL2020: CSKच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी MS Dhoniचा 'धाडसी' निर्णय; तुम्हीही कराल कौतुक

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या मोसमाची सुरुवात गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं होईल.

आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी Chennai Super Kings संघाला मोठे धक्के बसले. सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे दोन प्रमुख खेळाडूंनी IPL 2020मधून माघार घेतली.

आयपीएलसाठीच्या सरावाला सुरुवात करण्यापूर्वी Chennai Super Kingsच्या दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील 11 सदस्यांना कोरोनाची लागण झाली.

या संकटात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) च्या संघाची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

MS Dhoniच्या संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली असली तरी सुरुवातीला बसलेल्या धक्क्यांमुळे खेळाडूंचे मनोबल नक्कीच खचले होते.

पण, कॅप्टन कूल धोनीनं खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी धाडसी निर्णय घेतला आणि त्यानं खेळाडूंनाही मोठा धीर मिळाला आहे.

गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी चेन्‍नई सुपर किंग्‍स (Chennai super kings) समोर सलामीचा सामना न खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

पटेला यांच्या प्रस्तावानुसार चेन्नई सुपर किंग्सला 19 ऐवजी 23 सप्टेंबरला IPL 2020च्या मोहीमेची सुरुवात करण्याची विचारणा केली गेली होती.

त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंना सरावासाठी अधिक वेळही मिळाला असता आणि खेळाडूही मानसिक दृष्टीनं सज्ज झाले असते.

MS Dhoniनं हा प्रस्ताव नाकारला आणि त्यानं सलामीचा सामना खेळण्याचे मान्य केले. धोनीच्या या धाडसी निर्णयानं खेळाडूंमध्येही सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.

चेन्नई सुपर किंग्सला पहिल्या 6 दिवसांत 3 सामने खेळायचे आहेत आणि पहिल्या आठवड्यात तीन सामने खेळणारा तो पहिलाच संघ आहे.