Love Story : 'बार'मध्ये काम करायची जो रुटची पत्नी, लग्नाआधीच इंग्लंडच्या कर्णधार झाला होता बाप!

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट १००वा कसोटी सामना खेळला अन् द्विशतक झळकावून टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला.

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट ( Joe Root) हा स्वभावानं शांत, लाजरा, आपल्या कामाशी काम ठेवणारा आहे. चेपॉकवर तो १००वा कसोटी सामना खेळला अन् द्विशतक झळकावून टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला.

जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला अन् तो सर करता करता टीम इंडियाच्या फलंदाजांचा पुरता घाम निघाला. त्यामुळेच सामना ड्रॉ करण्याची टीम इंडियाची धडपड सुरू झाली. पण, जेम्स अँडरसन व जॅक लिच यांनी भारतीय फलंदाजांना तंबूत पाठवले आणि पहिली कसोटी २२७ धावांनी जिंकली.

चेहऱ्यानं शांत स्वभावाचा दिसणारा ३० वर्षीय जो रूट हा वैयक्तिक आयुष्यात बिनधास्त आहे. यशस्वी क्रिकेटपटू असलेला रूटचे वैयक्तिक आयुष्यही रोमांचक आहे.

जो रूटनं गर्लफ्रेंड कॅरी कॉटेरेल ( Carrie Cotterell) हिच्याशी २०१८मध्ये लग्न केलं. २०१६च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप दरम्यान रूट आणि कॅरी पहिल्यांदा चर्चेत आले होते.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं गुडघ्यांवर बसून कॅरीला लग्नाची मागणी घातली होती आणि दोन वर्ष ही दोघं एकमेकांना डेट करत राहिली.

कॅरीलाही क्रिकेटची फार आवड आहे. तिनं इंग्लंडच्या बार्मी आर्मीसोबतही टीमला चिअर करण्यासाठी प्रवास केला होता. कॅरी लिड्सच्या द आर्क या बारमध्ये काम करायची. इथेच तिची आणि रूटची भेट झाली.

रूट यॉर्कशायर कौंटी क्रिकेटकडून खेळतो आणि रूट व कॅरी अनेकदा बारमध्ये जिन पिण्यासाठी जायचे व पूल खेळायचे.

रूट व कॅरी यांना दोन मुलं आहेत. लग्नापूर्वीच रूट एका मुलाचा बाप बनला होता. २०१६मध्ये या दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर २०१७मध्ये कॅरीनं एका मुलाला जन्म दिला. १ डिसेंबर २०१८मध्ये दोघांनी लग्न केलं.

मागील वर्षीच कॅरीनं मुलीला जन्म दिला. त्यासाठी रूटनं पितृत्व रजा घेतली होती.