अर्ध्यावरती डाव सोडला... IPL मधून डझनभर परदेशी खेळाडू निघाले मायदेशी!

मुंबई, आयपीएल 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला सर्व संघ लागले आहेत. त्यामुळेच इंडियन प्रीमिअर लीगचा डाव अर्ध्यावर सोडून खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी रवाना होऊ लागले आहेत. सनरायझर्स हैदराबादचा जॉनी बेअरस्टोनं मंगळवारी आयपीएलच्या या हंगामातील अखेरचा सामना खेळला, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अष्टपैलू खेळाडू मोइन अली आज किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध अखेरचा सामना खेळणार आहे. इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या वर्ल्ड कप संघातील खेळाडूही मायदेशासाठी रवाना होणार आहे. माघारी परतणाऱ्या खेळाडूंचा सर्वाधिक फटका बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सला बसणार आहे. पाहूया कोणते खेळाडू मायदेशात परत जाणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिसही पुढील महिन्यात राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशात परतणार आहे. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या खेळाडूंसाठी 10 मेची अंतिम मुदत ठेवली आहे.

चेन्नईचा आणखी एक हुकुमी एक्का इम्रान ताहीरही मायदेशात परतणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या फिरकीपटूनं आयपीएलमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू मोइन अली आज यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहे

बंगळुरूच्या संघात डेल स्टेनने नवचैतन्य आणले होते, परंतु तोही पुढील महिन्यात वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी मायदेशात रवाना होईल

बंगळुरुचाच मार्कस स्टॉइनिसही डाव अर्ध्यावर सोडून जाणार आहे

दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रीच क्लासेनलाही बंगळुरूचा डाव अर्ध्यावर सोडावा लागेल

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर

सनरायझर्स हैदराबादचे डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, शकीब अल हसन

मुंबई इंडियन्सचे जेसन बेहरेन्डॉर्फ आणि क्विंटन डी कॉक

किंग्ल इलेव्हन पंजाब डेव्हिड मिलर

दिल्ली कॅपिटल्स कागिसो रबाडा

कोलकाता नाइट रायडर्स जो डेन्ली