भारताच्या प्रशिक्षकपदासाठी या सहा उमेदवारांमध्ये शर्यत, कोण ते जाणून घ्या...

रवी शास्त्री : हे सध्या भारताचे मुख्य प्रशिक्षक आहे. भारताकडून खेळताना त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याचबरोबर समालोचनही त्यांनी केले आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शास्त्री यांना या पदावर कायम ठेवणार की त्यांचे हे पद जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रवी शास्त्री हे संघाचे जून २०१६ पर्यंत संचालक होते. २०१७ मध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक म्हणून झाली.

टॉम मूडी : मुडी हे श्रीलंकेचे प्रशिक्षक आहेत. मुडी हे सनरायजर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहतात.

रॉबिन सिंग : भारतीय उमेदवारांपैकी रॉबिन सिंग हे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. ते सर्वकालिक सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहेत. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी २० विश्वचषकातील विजेत्या भारतीय संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षकदेखील होते.

लालचंद राजपूत : लालचंद राजपूत हे २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी २० विश्वचषकातील विजेत्या भारतीय संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि अफगाणिस्तानच्या संघाचे प्रशिक्षकपदही त्यांनी भूषवले आहे.

फिल सिमन्स : सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यात देखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे.

माईक हेसन : हेसन हे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आहेत. २०१५ साली त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.