भेटा सौरव गांगुलीच्या लाडक्या लेकीला, जाणून घ्या तिच्याबद्दल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं क्रिकेट कारकिर्दीप्रमाणे प्रशासकिय कारकिर्दीची सुरुवात झोकात केली आहे. त्यानं कोलाकाता कसोटी डे-नाईट खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला, शिवाय देशातील प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंनाही योग्य मानधन मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दहा महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गांगुलीकडून अशाच धाडसी निर्णयाची अपेक्षा आहे.

बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून गांगुली सध्या चर्चेत असला तरी आज मात्र त्याची चर्चा एका वेगळ्याच गोष्टीमुळे होत आहे. रविवारी गांगुलीनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला.

तसा तो नेहमी करतो, पण आज त्याच्या फोटोत त्याची कन्या सना गांगुलीही होती. त्यामुळे सनाच्या चर्चेच्या निमित्तानं गांगुली चर्चेत आहे.

1 नोव्हेंबर 2001मध्ये सना गांगुलीचा जन्म झाला.

सात वर्षांची असताना सनानं क्लासिकल डान्स शिकला होता.

सनाची आईही क्लासिकल डान्सर आहे आणि सनालाही आईसारखेच बनायचे आहे.

सना सध्या शैक्षिणिक अभ्यासक्रम पूर्ण करत आहे.

तिनं कृष्णा या नृत्य नाटकातून कामाला सुरुवात केली होती. ज्यात तिनं युवा कृष्णाची भूमिका वटवली होती.

सना आणि सौरव गांगुली यांनी एका ज्वेलरीच्या जाहीरातीतही काम केले आहे.

त्यानंतर सना सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह राहू लागली आणि सौरव प्रमाणे तिचाही मोठा चाहतावर्ग आहे.