फुटबॉलच्या मैदानावर सुरू झाली KKRच्या नितीश राणाची लव्ह स्टोरी, वयाने मोठी आहे पत्नी!

कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR) स्टार फलंदाज नितीश राणा आयपीएल २०२१मध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्येही आपल्या फलंदाजीनं प्रतिस्पर्धींना हतबल केले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR) स्टार फलंदाज नितीश राणा आयपीएल २०२१मध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्येही आपल्या फलंदाजीनं प्रतिस्पर्धींना हतबल केले आहे.

क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घालणाऱ्या भारतीय फलंदाजाची प्रेम कहाणीही तितकीच रोमांचक आहे. साची मारवाह असे नितीशच्या पत्नीचं नाव आहे आणि या दोघांची लव्ह स्टोरी फुटबॉल मैदानावरून सुरू झाली होती.

लग्नापूर्वी नितीश व साची यांनी एकमेकांना जवळपास साडेतीन वर्ष डेट केलं.

नितीशनं एका मुलाखतीत सांगितले की, साचीचा भाऊ आणि माझा भाऊ फुटबॉल सामना खेळत होते आणि क्रिकेटमधून ब्रेक मिळाल्यानंतर मी फुटबॉल खेळायला जायचो आणि तिथेच साची सोबत भेट झाली.

२०१६मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि १९ फेब्रुवारी २०१९मध्ये दोघांनी लग्न केलं. साची ही नितीशपेक्षा अडिच वर्षांनी मोठी आहे.

पण, नितीशला पाहत्याक्षणी साचीशी प्रेम झालं आणि त्यानं वयाचा विचार केला नाही.

साची ही इंटिरियर डिझायनर आहे आणि २०१५मध्ये तिनं तिच्या करिअरला सुरुवात केली. तिनं अंसल युनिव्हर्सिटी सुशांत स्कूल ऑफ डिझाईन येथून अभ्यास पूर्ण केला.

नितीशनं यंदाच्या पर्वात ६ सामन्यांत १८६ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्यानं ६६ सामन्यांत १६२३ धावा कुटल्या आहेत. त्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर ७ विकेट्सही आहेत.