सात वर्षांत IPLला झाला २६,३०० कोटींचा फायदा; जाणून घ्या फ्रँचायझी कशी करतात कमाई!

IPL brand value falls for first time in 6 years ग्लोबल व्हॅल्यूएशन अँड कॉर्पोरेट फायनान्स अॅडव्हायझर कंपनी Duff & Phelps यांनी सादर केलेल्या रिपोर्टनुसार मागील सहा वर्षांत पहिल्यांदा आयपीएलला तोटा सहन करावा लागला आहे.

ग्लोबल व्हॅल्यूएशन अँड कॉर्पोरेट फायनान्स अॅडव्हायझर कंपनी Duff & Phelps यांनी सादर केलेल्या रिपोर्टनुसार मागील सहा वर्षांत पहिल्यांदा आयपीएलला तोटा सहन करावा लागला आहे. आयपीएल २०२०तील ब्रँड व्हॅल्यू ३.६ टक्क्यांनी कमी होऊन ४५,८०० कोटींवर आली आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलला हा तोटा सहन करावा लागला आहे.

आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझी खेळाडूंसाठी ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पाडते, त्यांच्या राहण्याचा, प्रवासाचा खर्च, सपोर्ट स्टाफ यांच्यासह अनेक गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. एवढा खर्च करून मग फ्रँचायझी आयपीएलमध्ये कमाई कशी करतात, हा प्रश्न अनेकांना पडतो.

सात वर्षांत आयपीएलला कसा झाला २६,३०० कोटींचा फायदा. Duff & Phelpsच्या रिपोर्टनुसार २०१४मध्ये आयपीएल व्हॅल्यूएशन १९,५०० कोटी होता आणि २०२०मध्ये हे व्हॅल्यूएशन ४५,८०० वर पोहोचली आहे. पाहूया सालानुसार व्हॅल्यूएशन - २०१४ वर्ष - १९,५०० कोटी, २०१५ साल - २१,३०० कोटी, २०१६ साल - २७,५०० कोटी, २०१७ साल- ३४,४०० कोटी, २०१८ - ४१,८०० कोटी, २०१९ साल - ४७,५०० कोटी व २०२० साल - ४५,८०० कोटी.

कशी होते कमाई - बिझनेस, इंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स एकाचवेळी एकाच प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे आयपीएलला मोठा मार्केट उपलब्ध झाला आहे. मीडिया राईट्स, ब्रँड स्पॉन्सरशीप, तिकीट विक्री, प्राईज मनी आदींतून फ्रँचायझी कमाई करतात

आयपीएल टीमचे व्हॅल्यूएशन - मुंबई इंडियन्स - ८०९ कोटी ( २०१९ वर्ष) व ७६१ कोटी ( २०२० वर्ष), चेन्नई सुपर किंग्स - ७३२ कोटी ( २०१९) व ६११ कोटी ( २०२०), कोलकाता नाइट रायडर्स - ६२९ कोटी ( २०१९) व ५४३ कोटी ( २०२०), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ५९५ कोटी ( २०१९) व ५३५ कोटी ( २०२०), सनरायझर्स हैदराबाद ४८३ कोटी ( २०१९) व ४४२ कोटी ( २०२०), दिल्ली कॅपिटल्स ३७४ कोटी ( २०१९) व ३७० कोटी ( २०२०), पंजाब किंग्स ३५८ कोटी ( २०१९) व ३१९ कोटी ( २०२०), राजस्थान रॉयल्स २७१ कोटी ( २०१९) व २४९ कोटी ( २०२०).